अहमदनगरताज्या बातम्या

अकोले खरेदी-विक्री संघ निवडणुक…आजी-माजी आमदारांच्या मंडळांत चुरशीची लढत

अकोले तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी 13 जागेसाठी २६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. महाविकास आघाडीचे शेतकरी समृद्धी मंडळ विरूद्ध भाजपाचे शेतकरी विकास मंडळात या निवडणुकीत सरळ लढत होणार आहे.

अकोले तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक कार्यक्रम लागला आहे. काल गुरुवारी (दि.13) उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काही उमेदवारांचे अर्ज माघारी झाल्याने तीन वाजेनंतर 13 जागेसाठी 26 उमेदवारांचे अर्ज राहिल्याने हि निवडणूक समोरासमोर दुरंगी लढत होत आहे.

आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, आरपीआय यांच्या महाविकास आघाडीचे शेतकरी समृद्धी मंडळाचे 13 उमेदवार दिले असून भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या नेतृत्वाखाली व माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळाने 13 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरविले आहे.

या निवडणुकीत 13 जागेसाठी २६ उमेदवार असून समोरासमोर दुरंगी लढत होत आहे. येत्या 23 एप्रिल रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत मतदान होणार असून त्यानंतर 5 वाजता मतमोजणी होणार आहे. खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीच्या निमित्ताने पुन्हा आजी-माजी आमदार यांच्या मंडळांत चुरशीची लढत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button