आमदार बबनराव पाचपुते यांच्याबद्दल चिंताजनक बातमी ! प्रकृती…

आमदार बबनराव पाचपुते यांना आज अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तातडीने विधानभवनात अॅम्ब्युलन्स बोलावून त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे.पाचपुतेंच्या विनंतीवरून त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले.
तुर्तास त्यांनी प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार बबनराव पाचपुते यांची प्रकृती खालावल्याने त्यांना विधान भवनातून रुग्णवाहिकेत टाकून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बबनराव पाचपुते यांना आज दुपारी विधान भवनात श्वसनाचा त्रास सुरू झाला. बबनराव पाचपुते मागील अनेक दिवसांपासून आजारी आहेत. सार्वजनिक जीवनातला त्यांचा वावरही कमी झाला आहे.
मात्र अधिवेशनाच्या निमित्ताने ते नागपुरात आले आहेत.बबनराव पाचपुतेंना आज त्रास सुरु झाल्यावर त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना नेलं. तिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली.
त्यात त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. परंतु पाचपुतेंच्या विनंतीवरून त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तुर्तास त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.