All Time Favorite Cars : जमाना गेला, पण लोक ‘या’ गाड्या नाहीत विसरले; विश्वास आहे म्हणून करतायेत खरेदी…
देशात अशा काही कार आहेत ज्या लॉन्च होऊन खूप वर्ष झाली आहेत. मात्र अजूनही या कार भारतीय बाजारात सर्वात जास्त पसंत केल्या जातात.

All Time Favorite Cars : भारतीय बाजारात दरवर्षी अनेक कार लॉन्च होतात. व लोक ते खरेदी करतात. मात्र गेल्या काही काळात लॉन्च झालेल्या कार लोकांच्या मनात घर करून बसल्या आहेत. मोठ्या प्रमाणात लोक त्या खरेदी करत आहेत. म्हणजेच या गाड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
मासिक विक्री अहवालातही या वाहनांची पायपीट चांगलीच दिसून येते. आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही त्या वाहनांबद्दल सांगणार आहोत ज्या भारतीय बाजारपेठेत अनेक वर्षांपासून लोकांचा विश्वास जिंकत आहेत.
Hyundai Verna
Hyundai Verna 2006 मध्ये पहिल्यांदा लॉन्च करण्यात आली होती. या वाहनाला त्यावेळी इतका चांगला प्रतिसाद मिळाला की कंपनीने 2006 पासून चार वेळा आपली ही कार अपडेट केली आहे. आपण या वर्षी लॉन्च केलेली Hyundai Verna प्रगत अवतारात पाहू शकता, जिथे हे वाहन आतील ते बाहेरील अनेक बदलांसह येते.
मारुती स्विफ्ट
मारुती सुझुकी स्विफ्ट हे असे वाहन आहे, जे किफायतशीर किमतीत असूनही मध्यमवर्गीय लोकांसाठी प्रीमियम कारसारखे आहे. मारुती स्विफ्ट 2005 मध्ये लाँच झाली, तेव्हापासून आजतागायत या वाहनाला खूप मागणी आहे. जर तुम्ही रस्त्यावर निघाल तर तुम्हाला कुठेतरी मारुती स्विफ्ट नक्कीच दिसेल. आजकाल बरेच कॅब एग्रीगेटर देखील हे वाहन वापरतात.
महिंद्रा स्कॉर्पिओ
महिंद्रा स्कॉर्पिओ 2002 मध्ये लॉन्च झाली होती. त्यावेळी भारतीय बाजारपेठेत SUV वाहनांची संख्या फारच कमी होती, तरीही शहरी ते ग्रामीण भागात आपला झेंडा फडकवणारे हे वाहन आहे. आजच्या युगातही लोक महिंद्र स्कॉर्पिओकडे प्रीमियम एसयूव्ही कार म्हणून पाहतात.
जिथे बाजारात SUV गाड्यांची मागणी सर्वाधिक आहे, तिथे महिंद्रा स्कॉर्पिओ अजूनही सर्वाधिक मागणी असलेल्या कारपैकी एक आहे.
महिंद्रा बोलेरो
महिंद्रा बोलेरो सन 2000 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. हे वाहन 23 वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत आहे. 2000 पासून आतापर्यंत कंपनीने यामध्ये अनेक बदल केले आहेत. ती पूर्वीपेक्षा अधिक प्रगत झाली आहे, विक्रीच्या बाबतीतही, महिंद्रा बोलेरो अजूनही चांगल्या पायावर आहे.
मारुती सुझुकी अल्टो
मारुती सुझुकी अल्टो 2000 मध्ये लॉन्च झाली होती. आजही ती देशातील सर्वात स्वस्त कारपैकी एक आहे. मारुती अल्टो हे असे वाहन आहे ज्याने मध्यमवर्गीयांना चारचाकीवर बसण्याचा आत्मविश्वास दिला आहे.