टेक्नॉलॉजी

Amazon Offer : तुम्हाला खुश करणारी ऑफर ! सॅमसंगच्या 58 हजार रुपयांच्या 5G फोनवर मिळतेय 41 हजार रुपयांपर्यंत सूट, असा करा खरेदी

तुम्ही सॅमसंगचा 58 हजार रुपयांचा 5G फोन 41 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. ही खास ऑफर Amazon वर आहे.

Amazon Offer : जर तुम्ही महागडा फोन स्वस्तात खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आता तुमच्यासाठी ही संधी आलेली आहे. कारण आता Amazon च्या मोठ्या डीलमध्ये, तुम्ही Samsung चा महागडा फोन खूप स्वस्तात घरी आणू शकता.

मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंगच्या या फोनची किंमत 58 हजार रुपये आहे. मात्र Amazon ऑफरमध्ये तुम्ही हा फोन 41 हजार रुपयांच्या सूटवर मिळणार आहे.

हा Samsung Galaxy S22 5G फोन आहे.यामध्ये 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची MRP 85,999 रुपये आहे. Amazon India च्या डीलमध्ये तुम्ही 33% डिस्काउंट नंतर 57,999 रुपयांमध्ये ऑर्डर करू शकता. कंपनी या फोनवर 8,000 रुपयांची बँक डिस्काउंटही देत ​​आहे.

एक्सचेंज ऑफरमध्ये फोनची किंमत आणखी 32,700 रुपयांनी कमी केली जाऊ शकते. एक्सचेंज आणि बँक ऑफरसह, हा फोन तुम्हाला 40,700 रुपयांच्या एकूण सूटवर मिळू शकतो. मात्र ही सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि ब्रँड यावर अवलंबून असेल.

वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन जाणून घ्या

या सॅमसंग फोनमध्ये तुम्हाला 6.1 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीचा हा 5G फोन 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे. प्रोसेसर म्हणून, फोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 चिपसेट आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनलवर एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत.

यात 50-मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर सोबत 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि 10-मेगापिक्सेलचा टेलिफोटो सेन्सर आहे. सेल्फीसाठी 10 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला जात आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर फोन 3700mAh बॅटरीने सुसज्ज आहे.

तसेच ही बॅटरी 25 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. विशेष बाब म्हणजे या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 15 वॉट वायरलेस चार्जिंग फीचर देखील देण्यात आले आहे. दरम्यान, फँटम ब्लॅक, व्हाईट आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये येत असलेला हा फोन Android 12 वर आधारित Samsung च्या One UI वर काम करतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button