अहमदनगर

वाईन शॉपचे लायसन्स देण्याचे अमिष; नऊ लाखाला गंडा

अहमदनगर- एक्साईज विभागातून बोलत असल्याचे सांगून वाईन शॉपचे लायसन्स देण्याचे अमिष दाखवून एकास 8 लाख 86 हजार 800 रूपयांना फसविले. नानासाहेब आत्माराम खाडे (वय 35, रा. डोळेवाडी, ता. जामखेड) असे फसवणूक झालेल्यांचे नाव आहे.

 

वाईन शॉपचे लायन्स घेण्याची नशा नऊ लाख रुपयांना पडली. नानासाहेब खाडे यांना ९ ऑगस्ट २०२१ रोजी एका व्यक्तीने फोन करून, ’आपण राज्य उत्पादन शुल्क (एक्साइज डिपार्टमेंट) विभागातून बोलत आहोत. तुम्हाला वाईन शॉपचे लायन्स हवे आहे का ? अशी विचारणा केली. त्यानंतर व्हॉट्सअप नंबर आणि मेल आयडी वरून खोटे कागदपत्र पाठवून दिले. त्यामुळे खाडे यांचा हे कागदपत्र पाहून विश्वास बसला.

 

शासनाच्या विविध करांच्या बदल्यात त्यांच्याकडून पैसे घेतले. त्यांनी संबंधिताला ता. ९ ऑगस्ट २०२१ ते ता.१४ मार्च २०२२ दरम्यान आठ लाख ८६ हजार ८०० रुपये पाठवले. त्यानंतरही त्यांना लायन्स न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिस ठाण्यात तीन मोबाईल धारकांविरुद्ध फसवणूक आणि माहिती – तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button