Saturday, February 24, 2024
Homeब्रेकिंगअमित शाह यांच्या जवळच्या व्यक्तीचे निधन ! शोकाकुल गृहमंत्र्यांचा 2 दिवसांचा कार्यक्रम...

अमित शाह यांच्या जवळच्या व्यक्तीचे निधन ! शोकाकुल गृहमंत्र्यांचा 2 दिवसांचा कार्यक्रम रद्द

Amit Shah Sister Passes Away : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची बहीण राजेश्वरी बेन यांचे निधन झाले आहे. त्यांना फुफ्फुसाच्या आजाराने ग्रासले होते आणि अनेक दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात दाखल होते. शोकाकुल वातावरणामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी पुढील 2 दिवसांचे कार्यक्रम रद्द केले आहेत.

६५ वर्षीय राजेश्वरी बेन यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. त्या फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांचे फुफ्फुस प्रत्यारोपण झाले होते, पण आराम मिळत नव्हता. महिनाभरापूर्वी त्रास वाढल्याने त्यांना अहमदाबादहून मुंबईला रेफर करण्यात आले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ यांनी शोक व्यक्त केला

गृहमंत्री शाह यांच्या बहिणीच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. राजेश्वरी बेन यांच्या निधनाने दु:ख झाल्याचे त्यांनी सांगितले.

संपूर्ण शहा कुटुंबासाठी हा धक्का आहे. मी, माझे कुटुंब आणि संपूर्ण महाराष्ट्र सरकार त्यांच्या दु:खात सहभागी आहे. अमित भाई आणि संपूर्ण शाह कुटुंबीयांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

अमित शहा गुजरात दौऱ्यावर होते

गृहमंत्री अमित शहा सोमवारी गुजरात दौऱ्यावर होते. ते अहमदाबादमध्ये होते. परंतु बहिणीच्या मृत्यूची बातमी समजताच ते प्रथम मुंबईला पोहोचले आणि तेथून बहिणीचे पार्थिव घेऊन अहमदाबादला रवाना झाले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments