अहमदनगर

पोल्ट्री शेडचे काम सुरू असताना बसला विजेचा धक्का; तरुणाचा मृत्यू

अहमदनगर- पोल्ट्री शेडचे काम करत असताना विजेचा धक्का बसून बबन वंजारे (वय 36) या तरुणाचा मृत्यू झाला. श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे ही घटना घडली.

 

खोकर शिवारातील सुरेश लोखंडे यांच्या शेतात पोल्ट्री शेडचे काम सुरू होते. हे काम पुर्णत्वाकडेे असताना येथे शेडचे काम करणारा मुख्य कारागीर बबन वंजारे शेडवर चढून काम करीत होता. या शेडवरून खोकर एजी या 11 केव्ही वीज वाहक तारा गेलेल्या आहेत.

 

या तारांमुळे विजेचा धक्का बसून बबन गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे.काँ. अर्जुन बाबर करत आहेत. दरम्यान महावितरणचे कनिष्ठ अभियंता वैभव निकम व मदतनिस सुरेश पवार यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत बबन वंजारे यांनी काही दिवस श्रीरामपूर शहरातील सेंट झेवीयर स्कुलमध्ये शिक्षण सेवक म्हणून काम केले, त्यानंतर त्यांनी हा शेड बांधण्याचा व्यवसाय सुरु केला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button