अहमदनगर

नात्याला काळिमा फासणारी घटना; चुलत्याकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार

अहमदनगर- नगर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार महिन्यापूर्वी ही घटना घडली असली तरी याबाबत सोमवार, 14 नोव्हेंबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चुलत्याने सात वर्षीय अल्पवयीन पुतणीवर अत्याचार केल्याची घटना घडली.

 

पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चुलत दीर, त्याची पत्नी व मुलगी यांच्याविरूध्द अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 20 जून रोजी रात्री फिर्यादी यांची मुलगी खेळण्यासाठी घरातून बाहेर गेली होती. ती लवकर घरी आली नाही म्हणून फिर्यादी तिला पाहण्यासाठी गेल्या असता त्यांचा चुलत दीर याने मुलीला मांडीवर घेवून तिच्याशी गैरवर्तन करून अत्याचार केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

 

मुलगी खूप घाबरलेली असल्याने फिर्यादीने त्यांच्या पतीला बोलून घेतले. त्यांनी दीराकडे विचारणा केली असता त्याने, त्याच्या पत्नीने व मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास विरोध केला.

 

आरोपी चार महिने घर सोडून दुसरीकडे राहण्यास केला होता. दिवाळी सणानिमित्त तो घरी आला होता. त्याच्यासह पत्नी व मुलीने फिर्यादीच्या मुलीला 20 जून, 2022 रोजी घडलेल्या घटनेबाबत कोठेही वाच्यता करू नको, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button