सासू-सासर्यांच्या छळाला कंटाळून जावयाने उचललं टोकाचं पाऊल

अहमदनगर- सासू व सासर्यांच्या छळाला कंटाळून जावयाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला व जीवन संपविले. ही घटना काल सकाळी सहा वाजेपूर्वी शहरातील कतार वस्ती येथे घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील कतार वस्ती येथे राहणार्या लहू पवार याला गेल्या दोन वर्षांपासून त्याची पत्नी, सासू व सासरे यांच्याकडून त्रास सुरू होता. वेळोवेळी अपमान करून शिवीगाळ करणे, मारहाण करून उपाशीपोटी ठेवणे, असा त्रास त्याला दिला जात होता. या त्रासाला कंटाळून त्याने काल सकाळी सहा वाजे पूर्वी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली.
याबाबत अलका बापू पवार हिने शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी मयत लहू पवार याची पत्नी काजल पवार, सासू अनिता चंद्रकांत धोत्रे, सासरे चंद्रकांत शामराव धोत्रे सर्व रा. कतार वस्ती संगमनेर यांच्याविरुद्ध गुन्हा र.नं.82/2023 भादंवि. कलम 306, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.