Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरजिल्हा परिषदेत सोमवारी जागरण गोंधळ अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे अभिनव आंदोलन

जिल्हा परिषदेत सोमवारी जागरण गोंधळ अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे अभिनव आंदोलन

Ahmednagar News : महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम २००५ चे उल्लंघन करणारे व खासगी व्यवसाय चालविणाऱ्या जिल्ह्यातील एका नामांकित संस्थेच्या विद्यालयात कार्यरत असलेल्या

व्यक्तीला सेवेतून बडतर्फ केले जात नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने सोमवारी (दि.५ )जिल्हा परिषदेत प्रशासनाला जाग आणण्यासाठी जागरण गोंधळ करण्याचा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व जिल्हा सचिव रवींद्र मेढे यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील एका नामांकित संस्थेच्या मेहेकरी (ता. नगर) येथील विद्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी २०१० मध्ये तिसरे अपत्य झाले आहे.

त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम २००५ चे उल्लंघन केले आहे. तसेच तो व्यक्ती नातेवाईकांच्या नावे जेसीबी, ट्रॅक्टर, चार चाकी वाहने व डंपर खरेदी करून खाजगी व्यवसाय करत आहे.

शासकीय सेवेत असताना खाजगी व्यवसाय करता येत नसताना देखील त्याने सर्व नियमांची पायमल्ली केली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments