अहमदनगर

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; तरूण ठार

अहमदनगर – अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील २५ वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सागर बाळू काळे (रा. काळेवाडी, हिवरेझरे ता. नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे.

दौंड महामार्गावर हिवरे झरे ते चिखली गावाच्या सीमेवर असलेल्या म्हसोबाचा ओढा परिसरात ही घटना घडली.

मयत सागर हा अविवाहित होता. तो ट्रॅक्टर चालक होता. सोमवारी दिवसभर काम केल्यानंतर तो चिखली येथे ट्रॅक्टर मालकाच्या घरी ट्रॅक्टर लावायला गेला होता. तेथून रात्री दुचाकीवर नगर-दौंड महामार्गाने हिवरे झरे गावाकडे येत असताना म्हसोबाचा ओढा परिसरात अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेने तो दुचाकीसह रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला.

रात्रभर ही बाब कोणाच्याही निदर्शनास आली नाही. मंगळवारी सकाळी एक पाव विक्री वाला त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबला असता त्याने अपघात ग्रस्त दुचाकी आणि मयत तरुणाला पाहिले. त्यानंतर त्याने काही जणांना फोन करून ही माहिती दिली. ही माहिती मिळाल्यावर हिवरे झरे गावातील काही नागरिक तेथे गेल्यावर सदर मयत तरुण हा सागर काळे असल्याचे उघडकीस आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button