अहमदनगरताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात होणार अंगणवाडी सेविका भरती; किती आहे जागा? वाचा:

अहमदनगर- राज्यात अंगणवाड्यांमध्ये 2017 पासून रिक्त असलेले अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांची 20 हजार 601 पदे भरण्याचे आदेश राज्य सरकारच्या एकात्मिक बालविकास विभागाने काढले आहेत. या पदांची भरती 2023 च्या 31 मे पूर्वी होणार आहे.त्यानूसार नगर जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाने हालचाली सुरू केल्या असून जिल्ह्यात एप्रिल महिन्यात 882 अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे.

एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत राज्यात अंगणवाड्या चालवल्या जातात. ग्रामीण भागात शैक्षणिक आणि आरोग्याच्यादृष्टीने अंगणवाडी आणि त्यात काम करणार्‍या सेविका, मदतनीस यांचे महत्त्व अधिक आहे. 2020 मध्ये नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविले गेले.यात अंगणवाड्यांचा विकास करण्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार लक्ष घातलेले आहे. त्याच पार्श्वभुमीवर राज्यात अंगणवाडीमधील 20 हजार 601 जूनी रिक्त पदे भरली जाणार आहेत. राज्यात अंगणवाड्यांची संख्या आता वाढत आहे. यामुळे ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात बदल आले आहेत आणि त्यासोबतच रोजगारालाही चालना मिळणार आहे.

अंगणवाडी सेविकांसाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी, उच्च शिक्षणही ग्राह्य धरले जाईल. त्याप्रमाणे किमान वयोमर्यादा ही 35 वर्षे असणं अनिवार्य आहे. नगर जिल्ह्यात 21 बालविकास प्रकल्प कार्यरत आहेत. यात 5 हजार 634 अंगणवाड मंजूर असून यात 4 हजार 801 पदे मंजूर आहेत. यात अंगणवाडी सेविकांची 206, अंगणवाडी मदतनीस यांची 659 आणि मिनी अंगणवाडी सेविकांची 17 पदे अशी एकूण 882 पदे रिक्त आहेत.

या सर्व पदासाठी एप्रिल महिन्यांत भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाने तालुकास्तरावर असणार्‍या बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी तातडीने पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करून रिक्त होणार्‍या जागा आणि आधीच्या रिक्त असणार्‍या अंगणवाडी सेविकांची भरती करण्याचे आदेश दिले आहेत. यात फेबु्रवारी अखेर अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करून त्यानंतर तालुकानिहाय रिक्त जांगासाठी जाहीरात देवून एप्रिल महिन्यांत प्रत्यक्षात भरतीची प्रक्रिया राबवण्याच्या सुचना देण्यात आले आहे.

एप्रिल महिन्यांत जिल्ह्यात रिक्त असणार्‍या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांची पदे भरण्यात येणार शासनाच्या सुचने नूसार ही प्रक्रिया तालुका स्तरावर असणार्‍या बालविकास प्रकल्प अधिकारी पूर्ण करण्यात येणार आहे.- मनोज ससे, जिल्हा प्रकल्प अधिकारी, महिला बालकल्याण विभाग.

प्रकल्पनिहाय रिक्त जागा

नगर (नगर ग्रामीण 27, नगर ग्रामीण क्रमांक 2-36, भिंगार 22), नेवासा (नेवसा 28, वडाळा 22), श्रीगोंदा (श्रीगोंदा 83, बेलवंडी 17), पारनेर 49, पाथर्डी 18, शेवगाव 96, संगमनेर (संगमनेर 29, घारगाव 47, घारगाव 2-20), अकोले (अकाले 16, राजुर 4), श्रीरामपूर 72, राहुरी 66, कर्जत 131, जामखेड 70, राहता 41 आणि कोपरगाव 19 अशा 882 जागा रिक्त आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button