Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ! लाळ्या-खुरकूत आजारामुळे तब्बल 'इतकी' जनावरे...

Ahmednagar News : शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ! लाळ्या-खुरकूत आजारामुळे तब्बल ‘इतकी’ जनावरे दगावली

शेतकऱ्यांसमोरील आव्हाने, संकटे संपायची नावे घेईनात. अस्मानी सुलतानी संकटांचा सामना करता करता शेतकऱ्यांना नाकी नऊ आले आहेत. आता लाळ्या खुरकूत या आजाराने जनावरे दगावत असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेवगाव तालुक्यातील सालवडगाव येथे तब्बल या आजाराने सुमारे ११ जनावरे दगावली आहेत. याकडे पशुवैद्यकीय विभागाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

सालवडगाव येथील धनंजय टेकाळे यांच्या २ गायी, आदिनाथ नवनाथ लांडे १ गाय, अब्बास शेख १ गाय, अनिल काकासाहेब भापकर १ गाय, रेवणनाथ निक्ते यांच्या २ गायी, बाबासाहेब लांडे १ म्हैस, बाबासाहेब निवते १ गाय व भिवशेन गिरमकर १ गाय इतर एक बैल असे एकूण १० गायी व १ बैल एकूण ११ जानावरे दगावली आहेत.

लाळ्या खुरकुताची काय आहेत लक्षणे ?

जर जनावरांना खुरकुताची लागण झाली तर जनावर शांत होते तसेच ते नियमित पणे जसे चारा खाते, पाणी पिते ते त्यांचे कमी किंवा बंद होते. दुधाचे प्रमाणही तयां कमी होऊन जाते. जनावराच्या तोंडाच्या आतील भागाला तसेच जीभेवर फोड आलेले दिसतात तर पुढच्या पायांच्या मध्यभागी फोड आलेले दसितात.

असे करा प्रतिबंधात्मक उपाय

आजाराची साथच असेल तर जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नका तसेच आजारी जनावरांच्या चार पाण्याची व्यवस्था वेगळी करावी. आजाराने प्रादुर्भाव झालेली जनावरे बांधलेली असतात त्या जागेवर फवारणी करत राहून ती जागा निर्जंतुक करत राहावी. जनावरांचे दूध काढण्याचे भांडी निर्जंतुक करत राहणे गरजेचे आहे. त्याचा प्रमाणे जनावरांचे लसीकरण करणे, शक्यतो हे लसीकरण सप्टेंबर आणि मार्चमध्ये करणे गरजेचे असते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments