Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरव्यक्तीद्वेषाला विकास कामातून उत्तर देणार : आ. गडाख

व्यक्तीद्वेषाला विकास कामातून उत्तर देणार : आ. गडाख

Ahmednagar News : व्यक्तिद्वेशाच्या घाणेरड्या राजकारणावर स्वार्थाची पोळी भाजण्याची विरोधकांची नेहमीची कार्यशैली असली, तरी आपण मात्र विकास कामातून त्यांना चोख प्रत्युत्तर देणार असल्याचे प्रतिपादन आमदार शंकरराव गडाख यांनी केले.

नेवासा बुद्रुक येथील माकोटा वस्तीवरील सिंगल फेज रोहित्राच्या आरंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नेवासा बुद्रुक ग्रामस्थांनी आ. गडाख यांचा सत्कार केला.

यावेळी भूषण शिंदे, अण्णाभाऊ पेचे, प्रकाश सोनटक्के, सर्जेराव चव्हाण यांची भाषणे झाली. याप्रसंगी माकोटा वस्ती, नेवासा बुद्रुक, नेवासा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. गडाख म्हणाले, २००९ ते २०१४ या कालावधीत ९५८ ट्रान्सफॉर्मर आपण तालुक्यात बसवून अनेक नवीन वीज उपकेंद्रे उभारल्याकडे लक्ष वेधले.

तसेच नेवासा बुद्रुकच्या माकोटा वस्तीवरील ३० ग्राहकांकरिता ३०.३१ लाख रुपये खर्च करून नवीन सिंगल फेज रोहित्र बसविले.

पाटपाणी व वीज या दोन महत्त्वाच्या गोष्टींसाठी शासनाकडून अनेक मंजुऱ्या मिळवल्याचे त्यांनी नमूद करून मुळा धरणाच्या कॅनॉलसाठी ७० कोटी रुपये खर्चाला मंजुरी मिळवल्याचे त्यांनी सांगितले.

वीजेच्या बाबतीत ७० कोटी रुपयांचा आराखडा तयार करून त्यामध्ये घोगरगाव, धनगरवाडी वीज उपकेंद्राचे काम मंजूर करून घेतल्याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले. विकासाच्या बाबतीत रेटून काम करणार असल्याचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार करून नेवासा बुद्रुक येथील अनेक रस्त्याच्या खडीकरण,

मुरमीकरणाची कामे केल्याचे स्पष्ट करून नेवासा बुद्रुक – बहिरवाडी रस्ता कामासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. लक्ष्मी माता मंदिर, खंडोबा मंदिर सभा मंडपासाठी १५ लाख रुपयांचा निधी दिल्याचेही आ. गडाख यांनी सांगितले.

राजकारण म्हणजे संघर्ष असतो, संघर्ष विसरून पुढे गेले पाहिजे, संघर्ष कमी करा, आम्ही जे काम करतो त्याचाच खरा आनंद मग आम्हाला मिळतो व नवीन प्रश्न सुटण्यास मदत होते, असे आवाहन आ. गडाख यांनी यावेळी केले. नेवासा बुद्रुक हे पूर्ण मतदारसंघातील क्रांतिकारक गाव असल्याचा विशेष उल्लेख आ. गडाख यांनी केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments