Apple : ऍपलचा मोठा धमाका ! iPhone नंतर आता ‘हे’ डिव्हाइस बनवण्याचा सुरु आहे प्लॅन, जाणून घ्या…
जगभरात Apple हे खूप मोठे ब्रँड आहे. Apple ने बाजारात अनेक उत्पादने लॉन्च केली आहेत. जी मोठ्या प्रमाणात ग्राहकांना पसंत पडत आहेत.

Apple : जर तुम्ही आयफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी आता बाजारात एक नवीन उत्पादन लॉन्च करणार आहे. जे तुमच्या खूप फायद्याचे आहे.
वास्तविक, अॅपलची उत्पादने बनवणारी कंपनी फॉक्सकॉन लवकरच आपल्या हैदराबाद कारखान्यात अॅपल एअर पॉड्सचे उत्पादन सुरू करणार आहे. Foxconn ने हैदराबाद प्लांटसाठी US$ 400 दशलक्ष गुंतवणुकी करून याची निर्मीती करणार आहे. हे मेड इन इंडिया एअरपॉड्स असल्यामुळे या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात भारतीयांचा प्रतिसाद मिळेल असे सांगण्यात येत आहे.
भारतातील दुसरे उत्पादन
Apple च्या iPhone नंतर AirPods हे दुसरे उत्पादन असेल, ज्याचे उत्पादन भारतात सुरू होईल. हे दुसरे मेड इन इंडिया उत्पादन असेल, जे जगभरातील बाजारपेठेत उपलब्ध असेल. Apple चे AirPods TWS जगभरातील बाजारपेठेत विकले जातात.
Apple च्या AirPods ची लोकप्रियता
Apple चे AirPods भारतासह जगभरात लोकप्रिय आहेत. मजबूत आवाज गुणवत्तेसह अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये यामध्ये उपलब्ध आहेत. तसेच यामध्ये ऑडिओ कॉल दरम्यान आसपासचा आवाज काढून टाकण्याचे कार्य करते. एवढेच नाही तर कंपनीने यामध्ये एक खास फीचर दिले आहे, जे प्रत्येक व्यक्तीच्या कानाच्या आकारानुसार आवाज ट्यून करण्याचे काम करते.
एअरपॉड्सचा जागतिक TWS मार्केटमध्ये वाटा आहे
ऍपलच्या एअरपॉड्सचा जागतिक TWS मार्केटमध्ये 36 टक्के मार्केट शेअर होता, त्यानंतर ती नंबर-1 कंपनी म्हणून उदयास आली. यानंतर सॅमसंगचा मार्केट शेअर 7.5 टक्के होता. त्यानंतर Xiaomi चा 4.4 टक्के मार्केट शेअर होता आणि त्यानंतर बोटचा 4 टक्के शेअर होता.
तर OPPO चे नाव 3 टक्क्यांवर आहे. ही माहिती रिसर्च फर्म कॅनालिसने दिली आहे, जी डिसेंबर 2022 च्या तिमाहीसाठी आहे. Xiaomi ने नोएडा येथील Optiemus Electronics प्लांटमध्ये TWS चे उत्पादन देखील सुरु केले आहे. अशा प्रकारे Apple चे हे डिव्हाइस लवकरच भारतीयांसाठी उपलब्ध होणार आहे.