आर्थिक

APY Scheme : म्हातारपणाचा उत्तम आधार ! दरमहिन्याला 210 रुपये जमा करा आणि निवृत्तीनंतर दरमहा 5000 पेन्शन मिळवा; जाणून घ्या योजना

तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतर घरबसल्या दरमहा 5000 पेन्शन मिळवू शकता. तुमच्या गुंतवणुकीचे हे उत्तम साधन आहे.

Advertisement

APY Scheme : सध्याच्या युगात बचत करणे हे खूप महत्वाचे आहे. लोक भविष्याचा व म्हातारपणाचा विचार करून गुंतवणूक करत असतात. जेणेकरून वृद्धापकाळात त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये.

बाजारात अशा अनेक प्रकारच्या सेवानिवृत्ती योजना आहेत ज्यामध्ये लोक गुंतवणूक करत असतात. परंतु यापैकी सरकारची APY म्हणजेच अटल पेन्शन योजना खूप लोकप्रिय आहे. ही योजना 60 वर्षांनंतर सुखी जीवन जगण्यासाठी अधिक चांगली आहे, ज्यामध्ये तुम्ही दरमहा थोडी रक्कम जमा केल्यास तुम्हाला हमी पेन्शन मिळेल.

आत्तापर्यंत या योजनेशी 5 कोटींहून अधिक लोक जोडले गेले

Advertisement

सरकारची ही लोकप्रिय अटल पेन्शन योजना (APY) 2015-16 मध्ये सेवानिवृत्ती योजना म्हणून सुरू करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश पगारदारांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळावे हा होता.

यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही स्वतःसाठी नियमित उत्पन्नाची खात्री करू शकता. या योजनेच्या फायद्यांमुळे लोक त्याकडे आकर्षित होत आहेत, याचा अंदाज एपीवाय योजनेच्या ग्राहकांच्या वाढत्या संख्येवरून लावता येतो. आतापर्यंत 5 कोटींहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत.

निवृत्तीनंतर पेन्शनचे टेन्शन नाही

Advertisement

लोकांच्या वृद्धापकाळात पेन्शन हा सर्वात मोठा आधार आहे, कारण जेव्हा काम करण्यासाठी शरीर साथ देत नाही, मात्र पैशाची गरज ही असतेच. त्यामुळे अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणे हा एक फायदेशीर प्लॅन आहे.

यामध्ये तुम्ही निवृत्तीनंतर रु. 1000 ते रु. 5000 पर्यंतच्या मासिक पेन्शनचा लाभ तुमच्यानुसार दरमहा थोडी थोडी रक्कम जमा करून घेऊ शकता. यामध्ये गुंतवणुकीसाठी 18 ते 40 वर्षे वयोमर्यादा आहे. दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळविण्यासाठी, तुम्हाला APY योजनेमध्ये दरमहा 210 रुपये गुंतवावे लागतील.

18 ते 40 वर्षे वयोमर्यादा आहे

Advertisement

या योजनेसाठी अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. त्याच्याकडे एक वैध बँक खाते असणे आवश्यक आहे जे आधार कार्डशी जोडलेले आहे. याशिवाय अर्जदाराकडे मोबाईल क्रमांक असावा. तसेच तो आधीच अटल पेन्शनचा लाभार्थी नसावा. यामध्ये किमान योगदान कालावधी 20 वर्षे निश्चित करण्यात आला आहे.

सरकारने गेल्या वर्षी बदल केले होते

सरकारने गेल्या महिन्यात या योजनेच्या नियमात बदल केला होता. सरकारच्या नवीन नियमानुसार आयकर भरणारे (करदाते) या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. हा बदल 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात आला आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button