शुभ मंगल सावधान..! लग्न करणार आहात ? आधी ही बातमी वाचाच ! उन्हाळ्यात एकही लग्न होणार नाही…
कार्तिकी एकादशीला तुळशी विवाह सोहळा घरोघरी पार पडल्यानंतर खऱ्या अर्थाने लग्नसराई सुरू होते. या वर्षी अधिक श्रावणमासामुळे दिवाळी उशिरा आली आहे. त्यामुळे लग्नसराईलाही उशीर होणार आहे. या वर्षी मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त नसल्याने अनेकांची निराशा झाली आहे.

लग्नासारखी कार्ये शुभ मुहूर्त पाहूनच केली जातात. यासाठी ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती, पंचांग पाहिले जाते. हिंदू धर्मात विवाहासाठी शुभ मुहूर्त महत्वाचा असतो. कुंडली पाहून लग्नाचा शुभ मुहूर्त काढला जातो.
जर मुहूर्त न पाहता लग्न केले तर भविष्यात अडचणी येतात, अशी समज आहे. जे लोक नवीन वर्षात लग्न करण्याचा विचार करत आहेत, अशा लोकांनी नवीन शुभ मुहूर्ताबाबत जाणून घ्या…
नोव्हेंबर ते जूनपर्यंत एकूण ६६ मुहूर्त आहेत. गतवर्षीपेक्षा या वर्षी गोरज मुहूर्त अधिक असून, ४४ गोरज मुहूर्त आहेत.
मुहूर्त साधण्यासाठी यजमान मंडळींची घाई सुरू झाली आहे. त्यासाठी सभागृह बुकिंग, वाजंत्री, कॅटरर्स बुकिंग करण्यात येत असून कपडे, दागिने खरेदी सुरू करण्यात आली आहे. सभागृहावर लग्नाची तारीख निश्चित केली जात आहे.
२७ नोव्हेंबरपासून ६६ मुहूर्त
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तीन मुहूर्त आहेत. दिनांक २७, २८ व २९ या तीन मुहूर्तानंतर डिसेंबरमध्ये ८ मुहूर्त आहेत. नवीन वर्षात मात्र सर्वाधिक मुहूर्त आहेत. जानेवारीत ९ मुहूर्त आहेत. नवीन वर्षातील मुहूर्त साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
३ मे ते २८ जून एकही मुहूर्त नाही
३ मे ते २८ जून २०२४ पर्यंत लग्नासाठी एकही मुहूर्त नाही. त्यामुळे ५६ दिवस मुहूर्त नसल्यामुळे सभागृह, कॅटरिंग तसेच संबंधित व्यावसायिकांचे नुकसान होणार आहे. उन्हाळी सुट्टीत लग्नसमारंभ आयोजित केले जातात; परंतु मुहूर्तच नसल्याने निराशा झाली आहे.
४४ गोरज मुहूर्त
यावर्षी एकूण ४४ गोरज मुहूर्त आहेत. मे महिन्यात मुहूर्त • नसल्याने गोरज मुहूर्त साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या वर्षी अधिक मासामुळे लग्नाचे मुहूर्त लांबले आहेत. मात्र, गेल्या वर्षी वर्षीपेक्षा लग्नाचे मुहूर्त अधिक असून, गोरज मुहूर्तही अधिक आहेत, अशी माहिती सुहास वैशंपायन यांनी दिली आहे.
अधिकमासामुळे मुहूर्त लांबले
या वर्षी श्रावण अधिक मास असल्यामुळे दिवाळीचा सण लांबला. कार्तिकी एकादशीला तुळशी विवाह झाल्यानंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. त्यामुळे मुहूर्त लांबले आहेत. मुहूर्त साधण्यासाठी गोरज मुहूर्तालाही प्राधान्य दिले जात आहे.
कोणत्या महिन्यात किती मुहूर्त
नोव्हेंबर २७, २८, २९.
डिसेंबर ६, ८, १५, १७,२०, २१, २५, २६
जानेवारी २, ६, ८, १७, २२, २७, २९, ३०, ३१.
फेब्रुवारी १, ४, ६, १४, १७, १८.