अहमदनगर

कोरोनातून बरे झाले आहात ? मग आता काय ? ही महत्वाची वाचाच…

कोविड होऊन गेल्यानंतर शरीरातील पोषकतत्त्वांची पातळी जास्तीत जास्त राखण्यासाठी व शरीर लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी एका समतोल आहारपद्धतीचा उपयोग रुग्णांना होऊ शकतो. अशावेळी शरीराची पोषकतत्त्वांची वाढलेली गरज पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

कारण त्यामुळे या काळात रुग्णाचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य परत मिळविण्याच्या कामी त्याची मदत होते. आपले आरोग्य लवकरात लवकर परत मिळविण्यासाठी आपल्या दैनंदिन आहारात करावयाच्या काही सुधारणा पुढीलप्रमाणे:

रुग्णाच्या शरीरातील पोषकतत्त्वांच्या स्थितीनुसार त्याच्या/तिच्या आहारामध्ये पुरेशा कॅलरीजचा समावेश केला पाहिजे. एखादी व्यक्ती मधुमेहग्रस्त असेल तर तिने रक्तातील साखरेच्या पातळीवर देखरेख ठेवून त्यानुसार आपल्या आहाराचे नियोजन करायला हवे.

निरोगी असलेल्या व्यक्तीला कोविड झाल्यास तिने भरपूर कॅलरीज असलेले अन्न थोड्या थोड्या प्रमाणात वरचेवर खाणे उपयुक्त ठरू शकेल. कोविडमधून बरे झालेले शरीर आळसावते, त्याला ऊर्जा देण्यासाठी या कॅलरीजची मदत होईल. चिक्की, प्रोटीन बार्स, केळी किंवा आंब्यांसारखी खूप साऱ्या कॅलरीज देणारी फळे शरीराला झटपट ताकद मिळवून देण्यास मदत करू शकतात.

कोविड होऊन गेल्यानंतर शरीरासाठी सर्वाधिक महत्त्वाचे ठरणारे पोषकतत्त्व म्हणजे प्रथिने. शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोग्रॅममागे १.२ – १.५ ग्रॅम प्रथिनांचा आहारात समावेश असला पाहिजे.

प्रथिनांमुळे शरीरातील रोगप्रतिकारक पेशी ताज्यातवान्या होतातच पण त्याचबरोबर ते अँटीबॉडीज तयार करण्याच्या कामीही मदत करते आणि शरीराला आजारातून अधिक वेगाने बरे होण्यास प्रोत्साहन मिळते. शाकाहारी व्यक्तींनी दिवसातून २-३ वेळा डाळ, दुग्धजन्य पदार्थ, विशेषत: घट्ट दही आणि पनीर, शेंगा इत्यादींचे सेवन केले पाहिजे.

तुम्ही मांसाहारी असाल तर दिवसाला एक अख्खे अंडे खाणे फायदेशीर ठरू शकेल. चिकन किंवा मासे यांचाही आठवड्यातून तीनदा जेवणात समावेश करायला हवा. आहारातून पुरेसे प्रथिनं मिळत नसेल तर बाजारात व्यावसायिक विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या प्रोटीन सप्लिमेंट्सचा वापर करता येईल.

अँटीऑक्सिडन्ट्स आणि फळे, नारिंगी-पिवळ्या रंगाची फळे, भाज्या, हिरव्या पालेभाज्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ इत्यादी अ आणि क जीवनसत्त्वाचे समृद्ध स्त्रोत असलेले या जीवनसत्त्वांचे नैसर्गिक स्त्रोत असणा-या पदार्थांचा समावेश आपल्या रोजच्या जेवणात असणे अपरिहार्य आहे.

लोणी, साय, तूप, अवॅकॅडो, मासे, सुकामेवा आणि तेलबिया यांसारख्या पदार्थांद्वारे आपल्या आहारात स्वास्थ्यकारक स्निग्धपदार्थांचा समावेश करा. स्निग्धांशामुळे तुमचे अन्न अधिक सघन बनेल तसेच त्यात ऊर्जेचे बंदिस्त स्त्रोत समाविष्ट असतील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button