अहमदनगर
दरोडा टाकुन तरूणाचा खुन करणारा जेरबंद

चांदा (ता. नेवासा) येथे दरोडा टाकुन तरूणाचा खुन करणार्या आरोपींपैकी एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
बाबाखान शिवाजी भोसले (वय 45 रा. गोंडेगाव ता. नेवासा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला सोनाई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
बाबाखान हा मोक्का, दरोडा, जबरी चोरीच्या चार गुन्ह्यात पसार होता. त्याच्याविरूध्द नेवासा, श्रीरामपूर शहर, शिर्डी, शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
त्याने महाशिवरात्रीच्या रात्री इतर साथीदारांच्या मदतीने चांदा येथील कर्डिले वस्तीवर दरोडा टाकुन ओंकार गंगाधर कर्डिले या तरूणाचा खुन केला होता.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अटक केली आहे. त्याला मदत करणारे अन्य साथीदार पोलिसांना सापडलेले नाही.