आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोघांवर तोफखाना पोलिसांची कारवाई

आयपीएलवर सट्टा खेळविणार्या अड्ड्यावर तोफखाना पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश्वर सुनील आरडे (वय 25, रा. बोल्हेगाव गावठाण) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह स्वप्नील परवते (रा. माळीवाडा) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान हि कारवाई बोल्हेगाव येथील नवनाथनगरमध्ये सोमवारी रात्री पोलिस पथकाच्या वतीने करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल व रोख रक्कम जप्त केली आहे. पोलीस शिपाई गौतम नामदेव सातपुते यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ज्ञानेश्वर आरडे हा स्वप्नील परवते याच्या सांगण्यावरून राजस्थान रॉयल्स विरूध्द कोलकत्ता नाईट रायडर्स या दोन संघामध्ये चालू असलेल्या क्रिकेट सामन्यावर मोबाईल फोनद्वारे सट्टा खेळवत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक शैलेश गोमसाळे करत आहेत.