अहमदनगर

दिवाळी येताच चोरटे सक्रीय; कारची काच फोडून पावणे तीन लाख पळविले

अहमदनगर- सण-उत्सव काळात चोरटे सक्रीय होत असतात. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात चोरटे सक्रीय झाले आहेत.

 

एका व्यावसायिकाच्या कारची काच फोडून सीटवर ठेवलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. या बॅगमध्ये तीन लाख 75 हजार रूपयांची रक्कम होती. नगर-औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी हॉटेलजवळ सायंकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

 

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक गौरव विनोद मोरे (वय 25 रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ, गुलमोहर रोड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे नगर-औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी हॉटेलजवळ जी.एम. स्टाईल व भगवती ग्रेनईटचे दुकान आहे. मंगळवारी दिवसभर व्यावसायातून जमा झालेले तीन लाख 75 हजार रूपये फिर्यादी यांनी एका बॅगमध्ये भरून त्यांनी ती बॅग त्यांच्या कार (एमएच 16 सीसी 7574) मध्ये सायंकाळी सात वाजता ठेवले.

 

कार दुकानासमोर व्यवस्थित लॉक करून पार्क केली होती. फिर्यादी काही कामानिमित्त दुकानात गेले. यानंतर चोरट्यांनी कारची काच फोडून तीन लाख 75 हजार रूपयांची रक्कम असलेली बॅग चोरून नेली. फिर्यादी आठ वाजता कारजवळ आले असता त्यांना हा प्रकार लक्ष्यात आला. त्यांनी तोफखाना पोलिसांना याची माहिती दिली. गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button