अहमदनगर

रात्रीच्या वेळी अल्पवयीन मुलगी घराबाहेर पडताच तिघांनी केले…

अहमदनगर- अल्पवयीन मुलीला शिवीगाळ, मारहाण करत तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याची घटना रात्रीच्या वेळी नगर शहरातील एका उपनगरात घडली. या प्रकरणी चंद्रकांत साळवे, मनिषा चंद्रकांत साळवे (दोघे रा. दत्त मंदिराजवळ, केडगाव) व गोट्या (पूर्ण नाव माहिती नाही, रा. केडगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 वर्षिय पीडित अल्पवयीन मुलीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

फिर्यादी अल्पवयीन मुलीच्या वडिलांचे चंद्रकांत साळवे सोबत तीन ते चार महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. तेव्हापासून चंद्रकांत हा फिर्यादीचा राग राग करत होता. शनिवारी रात्री फिर्यादी क्लासमध्ये विसरलेले जर्किंग आणण्यासाठी पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चंद्रकांत, मनिषा व गोट्या यांनी तिला आडविले. मनिषाने तिचे हात धरले तर चंद्रकांतने तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

 

तसेच गोट्याने तिला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी अल्पवयीन मुलीने आरडाओरडा केला असता मारहाण, गैरवर्तन करणारे तिघेही पळून गेले. आरडाओरडा झाल्याने आसपासचे नागरिकांनी गर्दी केली. त्यांनी घडलेला प्रकार कोतवाली पोलिसांना व मुलीच्या नातेवाईकांना सांगितला. काही वेळातच मुलीचे नातेवाईक व कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

नातेवाईक व पीडित अल्पवयीन मुलीला कोतवाली पोलीस ठाण्यात आणले. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द विनयभंग, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस कोतवाली पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button