Thursday, May 23, 2024
Homeअहमदनगरपोलिस अडकले हद्दीच्या सीमारेषेत अन चिमुकल्याचा मृतदेह हातात घेऊन आईचा टाहो...

पोलिस अडकले हद्दीच्या सीमारेषेत अन चिमुकल्याचा मृतदेह हातात घेऊन आईचा टाहो…

Ahmednagar News : हातात अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन एक महिला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी टाहो फोडते मात्र तेथील पोलिसांना तिची किव येत नाही.

तर काही तास चौकशी करून शेवटी हा गुन्हा दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्यानेतेथेच दाखल करावा लागेल. या एका वाक्यात तीची बोळवण करण्यात आली. हे काही चित्रपटातील दृश्य नसून नगर जिल्ह्यातील कर्जत येथील घटना आहे.

दरम्यान येथे गुन्हा दाखल होत नसल्याचे पाहून पाच- सहा महिला त्या मृत बाळाचा मृतदेह घेऊन पोलिस स्टेशनच्या बाहेर पडल्या व पायी जाऊ लागल्या. यावेळी पोलीस स्टेशनचा एक पोलीस त्यांच्या मागे पळत गेला व पोलिसांच्या गाडीतून चौकशीसाठी घटनास्थळी घेऊन गेले.

सदर घटनेत पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षकांनी काही तास चौकशी करूनही त्यांना सदर मयत बाळाला दवाखान्यात पाठवावे, असे वाटले नाही.

काही तास चौकशी करूनही पुन्हा घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी या सर्वांना पोलीस घेऊन गेले. दरम्यान मयत बाळाची होत असलेली हेळसांड कोणाच्या हृदयाला पाझर फोडू शकली नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments