Saturday, February 24, 2024
Homeब्रेकिंगतसा मी डॉक्टर नाही, पण वेळ आली तर राजकीय शस्त्रक्रिया करू शकतो...

तसा मी डॉक्टर नाही, पण वेळ आली तर राजकीय शस्त्रक्रिया करू शकतो : आ. लंके

Ahmednagar News : कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कामामुळे फ्रान्सच्या विद्यापीठाने मला डॉक्टरेट दिली आहे. तसा मी डॉक्टर नाही, पण वेळ आली तर राजकीय शस्त्रक्रिया चांगल्या प्रकारे करू शकतो. असे मत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केल्याने जिल्ह्यात हा चर्चेचा विषय झाला आहे.

पारनेर तालुक्यातील कोरठण खंडोबा येथे यात्रे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात आ. लंके व आमदार राम शिंदे एकत्र आले होते, यावेळी आ. लंके बोलत होते. यावेळीपुढे बोलताना आ. लंके म्हणाले, आम्ही दोघेही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत. एकमेकांविषयी आत्मीयता व प्रेम आहे.

मोहटा देवीला जाताना योगायोगाने मी आ. शिंदे यांच्या गाडीचा चालक म्हणजे सारथी झालो व आता देशात रामराज्य आले असल्याने नगर जिल्ह्यातही ‘रामराज्य’ यावे व त्या रामराज्याचा मी सारथी असावे, अशी प्रार्थना खंडेरायाकडे केली आहे.

माझ्या राजकीय जीवनातील अडचणीच्या वेळी प्रा. शिंदे यांनी मला मदत केली आहे, असेही आमदार लंके म्हणाले. मला डॉक्टरेट मिळाल्यावर अन्य कुणाला डॉक्टरेट वा अन्य काही मिळाले त्याबद्दल मला बोलायचे नाही.

मी डॉक्टर झालो तरी ऑपरेशन करू शकणार नाही. मात्र, वेळ आली तर राजकीय शस्त्रक्रिया मला करता येईल, असेही आ. लंके म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments