अहमदनगर

लाईट चमकल्याने दुचाकी साईट गटारीत पडली; तरूण ठार

अहमदनगर- कोर्‍हाळे (ता. राहाता) येथे दुचाकीच्या अपघातामध्ये तरूणाचा मृत्यू झाला आहे. राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील कैलास ज्ञानदेव घोरपडे (वय 45) असे मृत तरूणाचे नाव आहे.

 

पिंपरी निर्मळ येथील कैलास घोरपडे हा तरुण गोदरेज पोल्ट्री कंपनीकडे नोकरीस होता. पोहेगाव येथील शेतकर्‍यांची मिटींग आटोपून शिर्डी-राहाता बाह्यवळण ररस्त्याने तो पिंपरी निर्मळ येथील घरी एमएच 17.एक्यु.1447 या दुचाकीवरून प्रवास करत होता. अंधार पडल्याने कोर्‍हाळे येथील वळणावर समोरून येणार्‍या गाडीच्या लाईट चमकल्याने साईड गटारात गाडी पडली.

 

मात्र त्या खड्ड्यात चिखल पाणी असल्याने व डोक्यात हेलमेट असल्याने त्यामध्ये चिखल व पाणी जाऊन गुदमरून कैलासचा दुर्दैवी मृत्यू झाला. पिंपरी निर्मळ येथील सामाजिक व धार्मिक कार्यात सहभागी असणार्‍या व हसतमुख असणार्‍या कैलासच्या अपघाती निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button