Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरपत्नी नांदत नसल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न पोलिस निरीक्षकांच्या दालनातच घेतले विष

पत्नी नांदत नसल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न पोलिस निरीक्षकांच्या दालनातच घेतले विष

Ahmednagar News : एका महिन्यापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या तरुणाने पत्नी नांदण्यास येत नसल्याच्या कारणातून श्रीगोंदा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या दालनातच विष प्राषन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

विकास थोरात (रा. चोराचीवाडी), असे त्या तरुणाचे नाव असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलीस निरीक्षक यांच्या दालनातच आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसारः तालुक्यातील चोराचीवाडी येथील विकास जयसिंग थोरात, या तरुणाने तालुक्यातीलच एका गावातील तरुणीशी (दि. २८) डिसेंबर २३ रोजी देवाची आळंदी येथील एका मंगल कार्यालयात घरच्यांच्या अपरोक्ष आंतरजातीय प्रेमविवाह केला होता.

लग्न करून आल्यानंतर ही तरुणी तिच्या वडिलांच्या घरी राहत होती. यादरम्यान त्या तरुणीने लग्न केल्याची कुणकुण तिच्या घरातील मंडळींना लागली होती. त्यातच पत्नी नांदण्यास येत नसल्याने विकास थोरात याने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीच्या अनुषंगाने ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ चे सुमारास पोलीस निरीक्षक भोसले यांच्या दालनात तरुण आणि तरुणीच्या नातेवाईकांच्यामध्ये चर्चा चालू असताना त्या नवविवाहित तरुणीने विकास थोरात याच्यासोबत जाण्यास नकार दिला.

तरुणीने नकार देताच विकास थोरात, याने पॅन्टच्या खिशातून विषारी औषधाची बाटली बाहेर काढत ती प्राशन केली. औषध प्राशन करताच तो खाली पडला, त्यास तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तिथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घडलेल्या घटनेबाबत पोलीस कर्मचारी संभाजी गर्जे यांच्या फिर्यादीवरून विकास थोरात, याच्याविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments