अहमदनगर

कट का मारला, असे विचारत तरूणाला पाईप आणि गजाने मारहाण… शहरातील घटना

दुचाकीवरून जात असताना कट का मारला, असे विचारत तरूणाला पाईप आणि गजाने मारहाण केल्याची घटना नगर शहरात घडली आहे.

या प्रकरणी करण खंडू पाचरणे (वय 28, रा. पितळे कॉलनी, एमआयडीसी) या तरुणाने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींची नवे खालीलप्रमाणे
अमोल पाडळे, ऋषी साळवे, अक्षय पवार, विकी साळवे, प्रतिक साळवे, महेंद्र तांबे (सर्व रा. निलक्रांती चौक, अहमदनगर) यांचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहित अशी, फिर्यादी पाचरणे त्याच्या मित्रांसह दिल्लीगेट परिसरातून दुचाकीवरून जात होता. त्यावेळी त्यांना आरोपींनी अडवून तुम्ही आम्हाला कट का मारला होता, असे विचारत शिवीगाळ करत शॉकअपच्या पाईपने आणि लोखंडी गजाने मारहाण केली.

दरम्यान याप्रकरणी करण पाचरणेच्या तक्रारीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button