Ather Energy 450S EV Scooter : Ola ची बत्ती गुल करणार Ather! लॉन्च करणार सिंगल चार्जवर 115KM धावणारी स्कूटर, किंमत आहे फक्त..
भारतीय ऑटो मार्केटमध्ये आता आणखी एक शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये स्वस्त आणि जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली जाणार आहे.

Ather Energy 450S EV Scooter : देशातील ऑटो क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत चालली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहेत. अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च झाल्या आहेत या इलेक्ट्रिक स्कूटरला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सध्या बाजारात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमती देखील अधिक असल्याने ग्राहकांना या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणे शक्य होत नाही. कंपन्यांकडून ग्राहकांचा विचार करता आता अनेक स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे.
एथर एनर्जी या इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर निर्माता कंपनीकडून आता त्यांची आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च करणार आहे. 450S असे Ather Energy च्या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव असणार आहे.
सिंगल चार्जवर 115KM चालेल
Ather Energy कंपनीकडून त्यांच्या सर्वाधिक रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर आगोदरच लॉन्च करण्यात आल्या आहेत. तसेच आता कंपनीकडून आणखी एक जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली जाणार आहे.
Ather Energy 450S ही आगामी इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये 115 किमी पर्यंत रेंज देण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच कंपनीकडून 450S या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रति तास देण्यात आला आहजे.
Ather Energy 450S साठी बुकिंग कधी सुरू होईल?
Ather Energy 450S ही आगामी इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही ती जुलै महिन्यामध्ये बुक करू शकता. जुलै २०२३ मध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग सुरु होणार आहे.
इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत
Ather Energy या वाहन निर्माता कंपनीकडून त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटर 450S ची अधिकृत किंमत जाहीर केली नाही. मात्र दाव्यानुसार या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाख 30 हजार रुपये असणार आहे.
कधी लॉन्च होणार?
Ather Energy कंपनीकडून त्यांची आगामी 450S ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतात 3 ऑगस्ट रोजी लॉन्च केली जाणार आहे. जर तुम्हाला ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर तुम्ही प्री-बुकिंगमध्ये 2500 रुपये भरून ही इलेक्ट्रिक स्कूटर बुक करू शकता. Ather Energy 450S ही स्कूटर Ola च्या S1 Air इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल.