अहमदनगर
गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले; ‘ऐवढ्या’ लाखांची रक्कम लंपास

अहमदनगर – एक्सीस बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे 25 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
चोरट्यांनी प्रथम एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे कट केले. त्यानंतर आत प्रवेश करुन गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले. त्यातील सुमारे 25 लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी चोरुन नेली आहे.
सकाळी पैसे काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांच्या ही घटना लक्षात आली. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एटीएमच्या जवळपास असलेल्या इतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका स्वीप्ट कारमधून चोरटे आल्याचे दिसून येत आहे.
त्यादृष्टीने पोलीस पुढील तपास करत आहे. पोलिसांची दोन पथके तपासासाठी रवाना करण्यात आली आहे.