अहमदनगर जिल्ह्यात अवकाळीचे रुद्र रूप ! 9 जणांचा मृत्यू , सहाशे पेक्षा जास्त घरांचे नुकसान
जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका आणि चारा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने एप्रिल महिन्यांत जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार हजेरी लावली. यात अनेक भागात विजा, झाडे, घर अंगावर पडल्याने 9 जणांना प्राण गमावावे लागले आहेत. माणसांसह लहान-मोठी अशी 29 जनावरे दगावली आहेत. 644 मालमत्तांचे अंशत नुकसान झाले आहे.
फळबागांचे मोठे नुकसान
आंबा, द्राक्षे, चिकू, संत्रा, मोसंबी या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. नेवासे, राहुरी, संगमनेर, जामखेड, पारनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदे, राहाता या तालुक्यातील गावांना फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे या भागातील पिकांच्या नुकसानीची प्राथमिक माहिती आली असली तरी अंतिम आकडेवारी येण्यास काही कालावधी आहे.
प्रत्येकी एक व्यक्तीचा मृत्यू
दुसरीकडे अवकाळी पावसात विजा पडून, झाडे आणि घरे अंगावर पडल्याने मृत्युमुखी पडल्या आहेत. नेवासे तालुक्यातील सर्वाधिक 3 जणांचा समावेश आहे. श्रीरामपूर तालुक्रातील 2 जणांचा मृत्यू झाला आहे. नगर, कोपरगाव, राहुरी, जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
अवकाळीमुळे जणावरे दगावली
याच अवकाळीमुळे लहान-मोठी अशी 29 जणावरे दगावली आहेत. जामखेड 6, कर्जत 4, नेवासे 6, संगमनेर 4, राहाता 2 तर श्रीरामपूर, राहुरी तालुक्यातील प्रत्येकी एक अशा 24 जनावरांचा समावेश आहे. लहान जनावरांमध्ये अकोले तालुक्यातील 4 तर शेवगाव तालुक्यातील एका जनावराचा समावेश आहे.
जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान
मालमत्तांच्या नुकसानीमध्ये नेवासे आणि राहुरी तालुक्यातील घरांचे प्रमाण जास्त आहे. नेवासे 348, राहुरी 206, संगमनेर आणि जामखेड प्रत्येकी 30, श्रीरामपूर 18, राहाता 8, पारनेर 2, कर्जत व श्रीगोंदे प्रत्येकी एक घराचे नुकसान झाले आहे. जनावरांच्या 15 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. जामखेड 7, नेवासे 3, नगर 2 तर राहाता, संगमनेर, पाथर्डी प्रत्येकी एका गोठ्याचे नुकसान झाले आहे.
- अहमदनगर ब्रेकिंग न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा
- अहमदनगरच्या आणखी बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
- तसेच आमचे फेसबुक पेज लाईक करा आणि ट्विटर वर फॉलो करा