अहमदनगरताज्या बातम्या

मराठा आरक्षण बद्दल बागेश्वर महाराज स्पष्टच बोलले ! म्हणाले देश गुलामीत होता तेव्हा…

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा काही दिवसांपासून पेटलेला आहे. मराठा समाजात गरीब लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने आरक्षण मिळणे हे गरजेचे आहे.

त्यामुळे मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा असल्याची भूमिका बागेश्वर महाराज यांनी पुण्यात व्यक्त केली. दोन दिवसांच्या सत्संगासाठी बागेश्वर महाराज हे पुण्यात आले होते. हनुमान चालीसा या कार्यक्रमापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बागेश्वर महाराज म्हणाले, मराठ्यांच्या बरोबर आम्ही आहोत, मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे. लोकांना सनातन संस्कृतीविषयी जागरूक करायला आलो आहे. सनातन धर्म हा सर्वांना तारक ठरणार आहे.

Advertisement

त्यामुळे या धर्माची शिकवण समाजात रुजवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासोबतच संत तुकाराम महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यासाठी मी माफी मागतो, असेही बागेश्वर महाराज म्हणाले.

जसा वेळ मिळेल तसा मी तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी देखील जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बागेश्वर महाराज यांनी त्यांचा विरोध करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर देखील निशाणा साधला.

बागेश्वर महाराज म्हणाले, विरोध करणाऱ्यांना कोण थांबवणार. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हाजमोलाची गोळी खावी. तसेच सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन आतापर्यंत दोनच राजकारणी माझ्याकडे आले आहेत, असेही माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले.

Advertisement

धीरेंद्र शास्त्री म्हणजेच बागेश्वर महाराज यांनी मराठा आरक्षणाबाबत यापूर्वी देखील भूमिका मांडली होती. मनातील ओळखणे वेगळे असते आणि अधिकारांवर बोलणे वेगळे असते.

भारत जेव्हा गुलामीत होता तेव्हा मराठ्यांनी शौर्य दाखवून स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळे बागेश्वर पीठ मराठा समाज बांधवांसोबत आहे. त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button