ताज्या बातम्या

Bajaj VS Yamaha : Pulsar NS125 की Yamaha MT 15 V2, तुमच्यासाठी सर्वोत्तम बाइक कोणती? जाणून घ्या

बजाजला 56 kmpl चा जास्त मायलेज मिळतो. त्याचवेळी, यामाहाची धन्सू बाईक 6 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग पकडते.

Advertisement

Bajaj VS Yamaha : भारतीय बाजरात अनेक नवनवीन बाइक लॉन्च होत असतात. यातीलच सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी Bajaj आणि Yamaha या दोन कंपन्या आहेत.

जर तुम्हीही नवीन बाइक खरेदी करण्याच्या विचारात असाल आणि Pulsar NS125 की Yamaha MT 15 V2 यापैकी कोणती बाइक खरेदी करायची याबाबत गोंधळात असाल खास तुमच्यासाठी आहे.

कारण आपण आज, बजाज पल्सर NS125 आणि यामाहा एमटी 15 V2 या दोन शक्तिशाली बाइक विषयी जाणून घेणार आहे. आम्ही तुम्हाला या दोन्ही बाईकची किंमत, फीचर्स आणि मायलेजबद्दल सांगणार आहे.

Advertisement

यामाहा MT 15 V2 बद्दल जाणून घेऊ

बाइकमध्ये 56 kmpl चा उच्च मायलेज

या पॉवरफुल बाइकमध्ये 155 सीसीचे धन्सू इंजिन उपलब्ध आहे. ही बाईक रस्त्यावर 56.87 kmpl चा उच्च मायलेज देते. बाइकला समोर आणि मागील दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक मिळतात, ज्यामुळे रायडरला रस्त्यावर पूर्ण नियंत्रण मिळते.

Advertisement

Yamaha MT 15 V2 चे शक्तिशाली इंजिन 18.4 PS पॉवर आणि 14.1 Nm पीक टॉर्क निर्माण करते. यात ट्यूबलेस टायर, एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळते. ही सुरुवातीची किंमत 1.68 लाख रुपये एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे.

बाईकचे वजन 141 किलो

Yamaha MT 15 V2 दोन प्रकारांमध्ये आणि सहा रंगांत येते. बाईकचे वजन 141 किलो आहे. यात लास्ट पार्क लोकेशन, malfunction alerts, आणि पोस्ट राइड स्टार्ट सारखी वैशिष्ट्ये मिळतात.

Advertisement

याशिवाय बाइकमध्ये सुरक्षिततेसाठी एबीएस, एलईडी इंडिकेटर, एलईडी हेडलाइट आणि टेल लॅम्प, साइड स्टँड देण्यात आले आहेत. यामध्ये वाय-कनेक्ट स्मार्टफोन अॅपद्वारे रायडर कॉल, ई-मेल आणि एसएमएस अलर्ट, सर्व्हिस रिमाइंडरचा पर्याय उपलब्ध आहे.

Bajaj Pulsar NS125 बद्दल जाणून घेऊ

एक प्रकार आणि 4 रंग पर्याय

Advertisement

बाइकमध्ये स्टायलिश हेडलॅम्प, मस्क्यूलर फ्युएल टँक आणि ट्विन एलईडी टेल लॅम्प देण्यात आले आहेत. यात एक प्रकार आणि 4 रंग पर्याय आहेत. ही बाईक 46.9 kmpl चा मायलेज देते. बाइकला 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते.

ही बाईक एक्स-शोरूम 1,25,599 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत बाजारात उपलब्ध आहे. बाईकच्या सीटची उंची 805 मिमी आहे. बाईकचे एकूण वजन 144 किलो आहे. बजाज पल्सर NS125 रस्त्यावर 112 kmph चा टॉप स्पीड देते.

ही डॅशिंग बाईक अवघ्या 6 सेकंदात 0 ते 100 kmph चा वेग पकडते. बजाज पल्सर NS125 मध्ये 124 cc चे शक्तिशाली इंजिन आहे. बाइकला स्प्लिट ग्रिल रेल आणि स्पोर्टी लुक मिळतो. याला पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि प्रीलोड-अॅडजस्टेबल मागील मोनो-शॉक सस्पेंशन मिळते.

Advertisement

बाईक 7000 rpm देते आणि तिचे धन्सू इंजिन 11.8 bhp पॉवर आणि 11 Nm टॉर्क देते. बाईकच्या पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक आहेत. सुरक्षेसाठी बाइकमध्ये कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button