आर्थिक

Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये बँकांना सुट्ट्याच- सुट्ट्या ! महत्वाची कामे असतील तर आत्ताच करा नियोजन; पहा यादी

सप्टेंबर महिना संपण्यासाठी फक्त 2 दिवस उरले आहेत. अशा वेळी ऑक्टोबरमध्ये अनेक सणांमुळे भरपूर सुट्ट्या असतात.

Bank Holidays : सध्या देशात सणासुदीचे दिवस आहेत. अशा वेळी अनेक जण बँकांमध्ये महत्वाच्या कामांसाठी जात असतात. मात्र काही वेळा बँकांना सुट्टी असल्याने त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो.

अशा वेळी जर पुढील महिन्यात तुमची बँकेसंबंधी काही महत्वाची कामे असतील तर तुम्ही ती लवकर पूर्ण करा. कारण ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या दिवसात अनेक दिवस बँकांना सुट्ट्यांना राहणार आहेत.

यामध्ये ऑक्टोबर महिन्यात बँकांमध्ये केवळ 15 दिवसच कामकाज होणार आहे. म्हणजे 15 दिवस बँकांना सुट्टी असेल. त्यामुळे पुढच्या महिन्यात बँकेत जाण्याचा तुमचाही विचार असेल तर सुट्टीची यादी पाहूनच बँकेत जा. दरम्यान, बँकांना कोणत्या दिवशी सुट्या असतील याची माहिती रिझर्व्ह बँक देते. रिझर्व्ह बँक प्रत्येक कॅलेंडर वर्षासाठी सुट्टीची यादी तयार करते.

Advertisement

तसेच आरबीआयने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीत यातील अनेक सुट्ट्या राष्ट्रीय आहेत. त्या दिवशी देशभरात बँकिंग सेवा बंद राहतील. त्याच वेळी, काही सुट्ट्या स्थानिक किंवा प्रादेशिक स्तराच्या असतात. त्या दिवशी बँकेच्या शाखा फक्त संबंधित राज्यांमध्येच बंद राहतील. त्यामुळे पंजाबमधील बँकांना कोणत्याही दिवशी सुट्टी असेल, तर महाराष्ट्रातील बँकाही त्या दिवशी बंद राहतील, अशी शक्यता नसते.

ऑक्टोबरमध्ये बँका किती दिवस बंद राहतील?

ऑक्टोबरमध्ये गांधी जयंती, नवरात्री आणि दसऱ्यामुळे अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. RBI च्या यादीनुसार ऑक्टोबर महिन्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह एकूण 15 दिवस बँका बंद राहतील. सार्वजनिक क्षेत्राव्यतिरिक्त खासगी क्षेत्रातील आणि प्रादेशिक बँकांनाही 15 दिवस सुट्टी असेल.

Advertisement

बँका कोणत्या दिवशी बंद राहतील?

1 ऑक्टोबर 2023 – रविवार रोजी देशभरात बँका बंद राहतील.
2 ऑक्टोबर 2023 – रोजी गांधी जयंतीनिमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
8 ऑक्टोबर 2023 – रविवार, रोजी देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
14 ऑक्टोबर 2023 – रोजी कोलकातामध्ये महालयामुळे आणि दुसऱ्या शनिवारी संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
15 ऑक्टोबर 2023 – रविवार, रोजी देशभरात बँकेला सुट्टी असेल.
18 ऑक्टोबर 2023 -रोजी काटी बिहूनिमित्त गुवाहाटीमध्ये बँका बंद राहतील.
21 ऑक्टोबर 2023 -आगरतळा, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता येथील बँकांना दुर्गापूजा/महा सप्तमीनिमित्त सुट्टी असेल.
22 ऑक्टोबर 2023 – रविवार, रोजी देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
24 ऑक्टोबर 2023 – दसऱ्यामुळे हैदराबाद आणि इंफाळ वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
25 ऑक्टोबर 2023 – गंगटोकमध्ये दुर्गापूजेमुळे (दसई) बँका बंद राहतील.
26 ऑक्टोबर 2023 – रोजी गंगटोक, जम्मू आणि श्रीनगरमध्ये दुर्गा पूजा (दसई)/प्रवेश दिनाला बँका बंद राहतील.
27 ऑक्टोबर 2023 – गंगटोकमध्ये दुर्गा पूजा (दसई) रोजी बँका बंद राहतील.
28 ऑक्टोबर 2023 – रोजी कोलकात्यासह संपूर्ण देशात लक्ष्मीपूजन आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.
29 ऑक्टोबर 2023 – रोजी देशभरात बँका बंद राहतील.
31 ऑक्टोबर 2023 – रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहमदाबादमधील बँकांना सुट्टी असेल.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button