अहमदनगर

बापरे! तीन टेम्पोतून कत्तलीसाठी जाणारे जनावरे पकडले

अहमदनगर- तीन टेम्पोमध्ये भरून कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या लहान-मोठ्या 59 म्हशी गोमाता स्वयंसेवकांनी शेंडी बायपास चौकात पकडल्या. तिन्ही टेम्पो एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोमाता स्वयंमसेवक किरण परसराम गुंड (वय 23 रा. पिंपळगाव माळवी ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

 

हमीद फकीर इनामदार (वय 35 रा. भोईआळी ता. जुन्नर, जि. पुणे), जावेद नबाब इनामदार (वय 35 रा. जुन्नर, ता. जुन्नर, जि. पुणे) व इरफान रफिक पठाण (वय 24 रा. जेऊर बायजाबाई ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा लाखांचे तीन टेम्पो व तीन लाख 43 हजारांच्या म्हशी असा नऊ लाख 43 हजारांचा ऐवज ताब्यात घेतला आहे.

 

तीन टेम्पोतून काही जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पिंपळगाव माळवी येथील गोमाता स्वयंमसेवकांना मिळाली होती. गोमाता स्वयंमसेवकांनी शेंडी बायपास चौकात थांबून संशयीत तीन टेम्पो पकडले. सदरचे टेम्पो एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. सदरचा म्हशी टेम्पोमध्ये कुठल्याही प्रकारची चार्‍या पाण्याची सोय न करता कोंबुन कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे समोर आले.

 

त्यातील पाच ते सहा लहान म्हशी (वगार) जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे. यासंदर्भात अधिक तपास पोलीस अंमलदार संदीप आव्हाड करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button