अहमदनगर

बापरे! कुत्रे भुकताच तरूणावर झाला खूनी हल्ला

अहमदनगर- कुत्रे भुकल्यानंतर केडगाव उपनगरात दोन कुटुंबात वाद झाले. या वादात तरूणाला लोखंडी धारदार मोठी कात्री, लोखंडी हुक व लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चंद्रकांत विष्णू साळवे (वय 34) असे जखमी तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी मनिषा चंद्रकांत साळवे (वय 26) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सुनील शिरसाठ, गर्व सुनील शिरसाठ, प्रियंका सुनील शिरसाठ (सर्व रा. पाच गोडाऊनजवळ, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मनिषा साळवे व त्यांचे पती चंद्रकांत साळवे हे शिरसाठ यांच्या घरासमोरून पायी जात असताना शिरसाठ यांचे कुत्रे मनिषा यांना भुकले.

 

तेव्हा चंद्रकांत मनिषाला म्हणाले,‘तु भिवू नकोस कुत्रे काही करत नाही’, त्यावर सुनीलने मनिषा यांना शिवीगाळ करून लोखंडी धारदार कात्री, हुकने व लाकडी दांडक्याने चंद्रकांत यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने थांब तुला मारूनच टाकतो, असे म्हणून मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादी म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button