अहमदनगर

बापरे! विषारी दारूमुळे ‘या’ ठिकाणी चार दिवसात दोन बळी

अहमदनगर- राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे प्रसादनगर परिसरात गावठी हातभट्टीच्या दारूमुळे चार दिवसात दोनजणांचा बळी गेल्याने तेथील महिला आणि नागरिकांनी राहुरी पोलिसांच्या निष्क्रियतेबाबत संताप व्यक्त केला आहे.

 

राहुरी तालुक्यात अवैध धंदे आणि मटका, जुगार व हातभट्टीच्या गावठी दारूमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. आता गावठी दारूमुळे तिसरा बळी गेला तर त्या मृतदेहावर राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारातच अंत्यसंस्कार करण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे.

 

दरम्यान, प्रसादनगरला मटका, जुगार आणि गावठी हातभट्टीच्या धंद्याला उधाण आले आहे. तर कराळेवाडीतही जुगार व मटका धंदा खुलेआम सुरू असल्याने नागरिकांनी पोलिसांच्या निष्क्रियतेबाबत संताप व्यक्त केला आहे. राहुरी फॅक्टरीवरील मटका आणि जुगार बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button