अहमदनगर

बीएसएनएल कंपनीच्या टॉवरमधील बॅटर्‍यांची चोरी

नगर तालुक्यातील वाटेफळ आणि रूईछत्तीशी येथील बी. एस. एन. एल कंपनीच्या दोन टॉवरमधील 48 हजार रूपये किंमतीच्या बॅटर्‍या चोरट्यांनी चोरून नेल्या.

गुरूवारी सकाळी नऊ ते 10 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बी. एस. एन. एल. कंपनीचे टेक्नीशियन भाऊसाहेब माणिक बनसोडे (वय 46 रा. भातोडी पारगाव ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

वाटेफळ शिवारात शाहुराव शंकरराव नारळे यांच्या शेत गट नं. 165 मध्ये एक तर रूईछत्तीशी शिवारात शोभा बाबासाहेब भांबरे यांच्या शेतामध्ये दुसरे बी. एस. एन. एल. कंपनीचे टॉवर आहे.

गुरूवारी सकाळी नऊ ते 10 वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी दोन्ही टॉवरमधील बॅटर्‍यांची चोरी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गांगर्डे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button