Health Tips : अन्न नीट गिळता येत नसेल तर सावधान ! असू शकतो हा आजार
या आजारात पोटाच्या खालच्या भागातून अन्ननलिकेचे कार्य बंद पडते. अचलेशियाची स्थिती अन्ननलिकेमधील खराब झालेल्या नसांशी संबंधित आहे. त्याचा परिणाम रुग्णाच्या संपूर्ण शरीरावर होतो,

Health Tips : अचलेशिया कार्डिया’ हा एक दुर्मीळ विकार असून एक प्रकारचा अन्ननलिकेचा आजार आहे. यामुळे अन्न नीट गिळता येत नाही. अचलेशिया कार्डियामध्ये अन्ननलिका पोटातून अन्न आणि द्रव वाहून नेण्यास सक्षम नसते.
या आजारात पोटाच्या खालच्या भागातून अन्ननलिकेचे कार्य बंद पडते. अचलेशियाची स्थिती अन्ननलिकेमधील खराब झालेल्या नसांशी संबंधित आहे. त्याचा परिणाम रुग्णाच्या संपूर्ण शरीरावर होतो,
याबाबत अधिक माहिती सैफी, नमाहा आणि अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल्स, मुंबईच्या सल्लागार, बॅरियाट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर देत आहेत.
१ ) लोअर एसोफेजियल स्फिंक्टर (एलईएस) डिसफंक्शन: एलईएस, जो अन्ननलिकेच्या खालच्या टोकाला असलेला स्नायू आहे. अन्न गिळताना तो पूर्णपणे उघडू न शकल्याने या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात.
२ ) अन्ननलिका पेरिस्टॅलिसिस : पेरिस्टॅलिसिस हे अन्ननलिकेद्वारे पोटातून अन्न खालच्या दिशेने आणण्यास मदत करते. अचलेशियामध्ये पेरिस्टॅलिसिस कमकुवत किंवा अनुपस्थित असल्याने अन्न सहजासहजी खालच्या दिशेने जात नाही.
३) अन्ननलिका प्रसरण पावणे : अन्ननलिकेमध्ये अन्न आणि द्रव टिकून राहिल्याने त्याचा विस्तार होतो. यामुळे न पचलेले अन्न पुन्हा बाहेर येते आणि छातीत दुखते.
★ ‘डिसफॅगिया’ म्हणून ओळखले जाणारे घन पदार्थ आणि द्रव गिळण्यास अडचण.
★ न पचलेले अन्न किंवा द्रव घशात किंवा तोंडात जाणे.
★ छातीत जळजळ, ढेकर येणे, उलट्या होणे..
★ जेवताना किंवा जेवणानंतर छातीत दुखणे किंवा अस्वस्थता
★ अन्नाचे सेवन कमी झाल्यामुळे आणि गिळण्यास त्रास झाल्यामुळे वजन कमी होते.
★ गंभीर प्रकरणांमध्ये दम्यासारखी लक्षणे दिसतात.
उपचार पद्धती सर्जिकल मायोटॉमी:
अडथळा दूर करण्यासाठी एलईएस शस्त्रक्रियेने कापले जाते किंवा त्याचे विच्छेदन केले जाते. हे पारंपरिक ओपन सर्जरीद्वारे किंवा लॅपरोस्कोपिक किंवा रोबोटिक- असिस्टेड शस्त्रक्रिया यांसारख्य तंत्राद्वारे केले जाऊ शकते.
कार्डियाक अचलेशियाची कारणे काय आहेत?
बहुतेक प्रकरणांमध्ये मूळ कारण अज्ञात राहते. हे स्वयंप्रतिकार रोग, अनुवांशिक घटक किंवा विषाणूजन्य संसर्गामुळे होऊ शकते, जे अन्ननलिकेच्या चेतापेशींना प्रभावित करते. तथापि अचलेशियाची नेमकी कारणे पूर्णपणे समजलेली नाहीत.
अचलेशिया कार्डियाचे निदान कसे केले जाते?
अचलेशियाच्या निदानामध्ये वैद्यकीय इतिहासाचे मूल्यांकन, शारीरिक तपासणी आणि विविध चाचण्या यांचा समावेश होतो. या चाचण्यांमध्ये बेरियम स्टॅलो एक्स- रे यांचा समावेश असू शकतो,
जो सामान्यतः अन्ननलिकेच्या खालच्या टोकाचा अरुंदपणा दर्शवतो, ज्याला ‘बर्ड बीक’ म्हणून ओळखले जाते, अन्ननलिका मॅनोमेट्री (अन्ननलिकेतील दाब मोजणे) आणि वरील भागाची जीआय एन्डोस्कोपी केली जाते.