अहमदनगर
बसमधून प्रवास करताना सावधान! ‘या’ महिला चोरतात दागिने

अहमदनगर- तिसगाव ते भिंगार बस प्रवासादरम्यान एका महिलेकडील एक लाख 57 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने दोन महिलेने काढून घेतले. रूख्मीणी अशोक वारे (वय 40 रा. जोडमोहोज ता. पाथर्डी) असे दागिने चोरीला गेलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोन महिलेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
रूख्मीणी वारे या भिंगारकडे येण्यासाठी तिसगाव येथून बसमध्ये बसल्या होत्या. प्रवास सुरू असताना दोन महिलांनी वारे यांच्याकडील दोन तोळ्याचा सोन्याचा हार, नेकलेस, चैन, गंठण, अंगठी, मनी, गळ्यातील शिंपल्या असे एक लाख 57 हजार रूपयांचे दागिने काढून घेतले. भिंगारमध्ये उतरल्यानंतर दागिने चोरीला गेल्याचे वारे यांच्या लक्ष्यात आले. त्यांनी दुसर्या दिवशी रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
Advertisement