अहमदनगर

विवाहितेला मारहाण करत काढले घराबाहेर; पतीसह पाच जणांविरूध्द गुन्हा

घरात लागणार्‍या वस्तू माहेरून आणाव्यात म्हणून विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. तिला घराच्या बाहेर काढून देण्यात आल्याची घटना अहमदनगर शहरात घडली.

या प्रकरणी विवाहितेचा छळ करणार्‍या पतीसह पाच जणांविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती परवेज अहमद बेहलिम, सासू निकत बेहलिम, सासरे रफिक अहमद मोहम्मद यासीन बेहलिम,

दीर तरबेज अहमद रफिक बेहलिम व नंनद नाजनिन रियाज गौरी (सर्व रा. विमाननगर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. 27 डिसेंबर, 2015 ते फेब्रुवारी 2017 दरम्यान ही घटना घडली असून

या प्रकरणी पीडित विवाहितेने गुरूवार, 21 एप्रिल, 2022 रोजी फिर्याद दिली आहे. घरात लागणार्‍या वस्तू आई-वडिलाकडून घेऊन ये, असे म्हणून आरोपींनी फिर्यादीला वेळोवेळी शिवीगाळ, मारहाण करत मानसिक त्रास दिला.

यानंतर फिर्यादी यांना घरातून बाहेर काढून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विवाहितेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी भादंवि कलम 498 (अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक सलिम शेख करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button