अहमदनगर

किरकोळ कारणावरुन दोन गटात तलवारीने, काठयांनी मारहाण

किरकोळ कारणावरुन दोन गटात तलवारीने, काठयांनी मारहाण झाल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी गावात कमानीजवळच घडली आहे. यात चार जण जखमी असून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात 8 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील खिर्डी गावात कमानीजवळ मयुर राजेंद्र कुर्‍हाडे हा त्याच्या साथीदारांसमवेत सेंट्रींग कामाचे नियोजन करत असताना त्या ठिकाणी तान्हाजी सोनाजी बनसोडे, शुभम बनसोडे, अमोल बनसोडे, सुभाष रावसाहेब बनसोडे, सुनील किशोर साळवे व अन्य तीन जण त्या ठिकाणी आले. व काहीही कारण नसताना शिवीगाळ करून वाद घालत धमकी देवू लागले.

त्यावेळी मयुर राजेंद्र कुर्‍हाडे व त्याचे साथीदार शिवीगाळ करु नका असे सांगण्यास गेले असताना त्याचेवेळी या सर्वांनी तलवार व काठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत तिघेजण जखमी झाले असून त्यांना येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान या मारहाणीत मयूर भाऊसाहेब कुर्‍हाडे (वय 30), भाऊसाहेब देवराम कुर्‍हाडे (वय 60), अक्षय अनिल गायकवाड (वय 25) व संदीप अंबादास गायकवाड (वय 38) व भाऊसाहेब देवराम कुर्‍हाडे हे जखमी झाले आहे. .

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी हजर झाले. यावेळी घटनास्थळावरून पोलिसांनी दोन दुचाकींसह अन्य वस्तू तालुका पोलीस ठाण्यात जमा केल्या. अचानक झालेल्या मारहाणीमुळे गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button