अहमदनगर

यात्रेला गेलेल्या विवाहितेला मारहाण, विनयभंग

यात्रेनिमित्त देव दर्शनासाठी गेलेल्या विवाहितेला पाच जणांनी मारहाण केली. त्यांच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. पिंपळगाव उज्जैनि (ता. नगर) येथे ही घटना घडली.

या प्रकरणी पीडित विवाहितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुष्मा गजानन आल्हाट, प्रतिभा रमेश दळवी, रमेश पेत्रस दळवी, प्रेम रमेश दळवी, प्रदीप गजानन आल्हाट (सर्व रा. पिंपळगाव उज्जैनि) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी व त्यांची मुलगी पिंपळगाव उज्जैनि येथे यात्रेनिमित्त देवदर्शनासाठी गेल्या असताना आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केले.

रमेश दळवी व प्रेम दळवी यांनी फिर्यादी यांच्या सोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. प्रेम दळवी याने फिर्यादी यांच्या मुलीला मारहाण करून तिच्याकडील मोबाईल काढून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button