अहमदनगर

मारहाण भोवली… ‘त्या’ दोघा सख्ख्या भावाला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

तरुणास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघा सख्ख्या भावाला न्यालयाने 10 वर्षे सक्तमजुरी व 19 हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.

दया उर्फ बोंदू मच्छिंद्र नेटके व हरिश उर्फ कोंड्या मच्छिंद्र नेटके (दोघे रा. लालटाकी, भारस्कर कॉलनी, अहमदनगर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांविरुद्ध तात्या हरी खंडागळे यांनी फिर्याद दिली होती.

याबाबत अधिक माहिती अशी, तात्या खंडागळे यांच्या घरासमोर दया नेटके व हरिश नेटके हे दोघे सख्खे भाऊ राहतात. 26 नोव्हेंबर, 2019 रोजी रात्री दया नेटके व हरिश नेटके यांचे आपसात वाद होऊन एकमेकांना शिवीगाळ चालू होती.

दरम्यान प्रकाश खंडागळे घराचे बाहेर येऊन नेटके बधूंना म्हणाला,‘शिवीगाळ करू नका, येथे माझ्या मुली राहतात’. त्यावर हरिश नेटके याने प्रकाशला शिवीगाळ व दमदाटी केली व अंगावर धावत जाऊन त्याला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

आरोपी दया नेटकेने प्रकाश यास धारदार चाकूने गंभीर जखमी करून जीवे ठार माण्याचा प्रयत्न केला. घटनेबाबत तोफखाना पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातु यांच्या न्यायालयात चालला. युक्तिवाद, फिर्यादी, जखमी साक्षीदार, वैद्यकिय अधिकारी यांच्या साक्षी पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button