Bedsheet Change Time : घरातील खराब बेडशीट किती दिवसानंतर बदलावी? योग्य वेळ जाणून घ्या अन्यथा पडाल आजारी
आपण सर्वजण आपल्या घरात बेडवर बेडशीट घालून झोपतो, पण बेडशीट कधी बदलावी हे तुम्हाला माहीत आहे का? याविषयी जाणून घ्या.

Bedsheet Change Time : झोपताना तुमच्या बेडवर बेडशीट हे नक्की असते. अशा वेळी तुम्ही बेडशीट हे खूप खराब झाले तरी त्याचा वापर करत असता. सहसा लोक बेडशीट न धुता अनेक दिवस वापरतात.
अशा वेळी तुमच्या बेडशीटवर घाण जमा होण्यास सुरुवात होते. ही घाण सहसा तुमच्या डोळ्यांनी दिसून येत नाही. मात्र जेव्हा जास्त प्रमाणात ही घाण तुमच्या डोळ्यांना दिसायला लागते तेव्हा मग तुमचे बेडशीट धुण्याचा विचार तुमच्या डोक्यात येतो.
पण तुम्ही कधी विचार केला आहे की घाणेरडी बेडशीट तुमचे आरोग्य खराब करू शकते. खरं तर, धूळ, तेल, मृत त्वचेच्या पेशींसह अशा अनेक गोष्टी त्यात जमा होतात, जे संसर्गाचे प्रमुख कारण बनतात. अशा स्थितीत प्रश्न पडतो की, बेडशीट किती दिवसांत धुवावी, त्यामुळे आजारांपासून दूर राहता येईल.
बेडशीट किती दिवसात धुवावी?
अशा लोकांनी आठवड्यातून एकदा बेडशीट बदलावी
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला वारंवार शिंका येऊ लागल्या असतील किंवा घोरण्याची समस्या वाढली असेल. जर तुम्ही झोपेत असताना अनेकदा उठत असाल तर समजावे की बेडशीट बदलण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत, कोमट पाण्यात डिटर्जंट टाकून आठवड्यातून एकदा चादर पूर्णपणे धुवावी. असे केल्याने तुमच्या बेडशीटवरील सर्व संसर्गजन्य कीटक नाहीशे होतील.
दम्याचे रुग्ण असाल तर 3 दिवसांत बेडशीट बदला
जे लोक दम्याचे रुग्ण आहेत किंवा ज्यांना खूप घाम येतो. त्यांनी दर 3 दिवसांनी त्यांची बेडशीट बदलावी. अन्यथा, ते जीवाणू आणि विषाणूंचे गढ बनू शकते. ज्यामुळे तुम्ही गंभीर आजारी पडू शकता. त्यामुळे तुम्ही या काळात तुमचे बेडशीट स्वच्छ ठेवण्यासाठी ते सतत धुणे गरजेचे आहे.
घाणेरड्या पायांनी बेडवर पाऊल ठेवू नका
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुमच्या घरात स्वच्छतेचे वातावरण कितीही चांगले असले तरी ते एका आठवड्यापेक्षा जास्त काळ पडून राहू नये. यासोबतच बेडशीटवर बसून काहीही खाऊ नये, तसेच घाण पायांनी चढू नये. असे केल्याने तुमचे बेडशीट खराब होते व यावर अनेक किटाणू तयार होतात. त्यामुळे हे सर्व करून तुम्ही आजारी पडू शकता.