Best CNG Cars : सीएनजी कार खरेदी करायची? ‘या’ स्वस्त एसयूव्ही तुमच्यासाठी आहेत सर्वोत्तम; जाणून घ्या लिस्ट
मारुती सुझुकी ब्रेझाची सीएनजी आवृत्ती 88 पीएस पॉवर आणि 121.5 एनएम टॉर्क जनरेट करते. तर, Hyundai Exter Cng 8.24 लाखांमध्ये उपलब्ध आहे.

Best CNG Cars : भारतीय बाजारात अनेक नवनवीन कार लॉन्च होतात. मात्र सध्या प्रमाणात सीएनजी कार खरेदी करतात. जर तुम्हीही नवीन CNG कार खरेदीच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
सध्या भारतीय कार मार्केटमध्ये SUV वाहनांचा ट्रेंड आहे. या सेगमेंटमध्ये सीएनजी कारही खूप पसंत केल्या जातात. त्यामुळे 8 ते 15 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध अशा काही वाहनांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
मारुती सुझुकी ब्रेझा
बाजारात या कारची सुरुवातीची किंमत 8.19 लाख रुपये ते 14.04 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. कारचे CNG MT प्रकार रस्त्यावर 25.51km/kg मायलेज देते. कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.
मारुती सुझुकी ब्रेझाची सीएनजी आवृत्ती 88 पीएस पॉवर आणि 121.5 एनएम टॉर्क जनरेट करते. सुरक्षिततेसाठी, कारला सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), हिल-होल्ड असिस्ट, EBD सह ABS आणि मागील पार्किंग सेन्सर मिळतात. कारला आकर्षक सहा मोनोटोन आणि तीन ड्युअल टोन रंग मिळतात. LXi, VXi, ZXi आणि ZXi+ या कारच्या चार ट्रिम बाजारात उपलब्ध आहेत. हे सर्व प्रकारांमध्ये CNG आवृत्तीसह येते.
टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर सीएनजी
कारची CNG आवृत्ती 26.6 किमी/किलो मायलेज देते. त्याच्या CNG प्रकारात 1.5-लिटर K-Series पॉवर इंजिन आहे. कारचा CNG प्रकार 13.23 लाख रुपयांच्या एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.
त्याचे टॉप मॉडेल 15.29 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर एस आणि जी दोन वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये येते. यामध्ये कंपनीने फाइव्ह स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिला आहे.
Hyundai Exter Cng
कार 1.2-लीटर पेट्रोल इंजिनसह CNG आवृत्तीसह येते. हे इंजिन 82 bhp पॉवर आणि 114 Nm टॉर्क जनरेट करते. कारचे पेट्रोल व्हर्जन 20 kmpl चा उच्च मायलेज देते आणि CNG व्हर्जन 27.1 km/kg मिळते. ही कार एक्स-शोरूम 5.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.
कारमध्ये आकर्षक रंगाचे पर्याय देण्यात आले आहेत. कारमध्ये सुरक्षिततेसाठी, EBD सह ABS, 6 एअरबॅग्ज, हिल स्टार्ट असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण उपलब्ध आहे. कारला 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्स मिळेल. Hyundai Exter Cng 8.24 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे.