टेक्नॉलॉजी

Best Mileage Electric Cars : परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कार ! एका चार्जवर 450 किमी धावतात, जाणून घ्या यादी

तुम्ही पेट्रोल-डिझेलऐवजी इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकता. या कार तुम्हाला खूप परवडणाऱ्या ठरतात. आज आम्ही अशाच 5 इलेक्ट्रिक कारबद्दल सांगणार आहे.

Advertisement

Best Mileage Electric Cars : देशात सध्या मोठा प्रमाणात लोक कार खरेदी करत आहेत. आता यामध्ये इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले. आहे. कारण आता लोक प्रवासाला परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कार खरेदी करत आहेत.

कारण देशात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमती सतत वाढत आहेत. अशा वेळी लोकांना या कार चालवणे परवडत नाही. त्यामुळे पर्यायी मार्ग म्ह्णून लोक इलेक्ट्रिक कार खरेदी करत आहेत, त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत जोरदार तेजी आली आहे.

जर तुम्हीही कुटुंबासाठी नवीन कार शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप 5 स्वस्त इलेक्ट्रिक कारंबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही तुमच्या बजेटमध्ये राहून सहज खरेदी करू शकता. जाणून घ्या या 5 कारबद्दल….

Advertisement

भारतातील टॉप 5 इलेक्ट्रिक कार

Hyundai Kona Electric

Advertisement

Hyundai च्या Hyundai Kona इलेक्ट्रिक कारला 39.2kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी केवळ 57 मिनिटांत म्हणजे सुमारे एक तासात 80 टक्के चार्ज होते आणि सुमारे 6 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते.

असा दावा केला जातो की ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 452 किमी पर्यंत धावू शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 24 लाख रुपये आहे. ही कार तुम्ही हप्त्यांवरही घेऊ शकता.

Tata Nexon EV

Advertisement

तुम्ही Tata Nexon EV कारलाही सपोर्ट करू शकता. यात 141 HP ची पॉवर बॅटरी आहे, 250 NM टॉर्क जनरेट करते. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार नॉन-स्टॉप 312 किमी अंतर कापू शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 15 लाख रुपये आहे. ही कार खरेदी करून तुम्ही खूप बचत करू शकता, त्यामुळे ही तुमच्यासाठी परवडणारी कार ठरणार आहे.

Tata Tiago EV

Advertisement

Tata Tiago EV दोन बॅटरी पॅकसह येते. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ते 250 किमी ते 315 किमीपर्यंत धावू शकते. या कारमध्ये होम चार्जिंगसोबतच डीसी फास्ट चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे.

या कारची बॅटरी केवळ 57 मिनिटांत 80 टक्के पूर्ण चार्ज होऊ शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख रुपये आहे. 21 हजार रुपये देऊन तुम्ही ही कार बुक करू शकता.

Advertisement

Mahindra XUV400

Mahindra XUV400 मध्ये दिलेली बॅटरी 310Nm टॉर्क जनरेट करते. ही कार 34.5kWh बॅटरी पॅकसह 375 किमी पर्यंतचे अंतर कापते. तर दुसऱ्या बॅटरीसह ती 456 किमी अंतरापर्यंत जाऊ शकते. तुम्हाला ही कार 15.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत मिळू शकते. मात्र 21 हजार रुपये भरून तुम्ही ते स्वतःसाठी बुक करू शकता.

Advertisement

MG ZS EV

MG ZS EV ची ही इलेक्ट्रिक कार 176 PS ची पॉवर आणि 280 Nm टॉर्क जनरेट करू शकते. या आलिशान कारमध्ये 50.3kWh उच्च व्होल्टेज बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरीची क्षमता इतकी आहे की ती एका तासात 80 टक्के पूर्ण चार्ज होते. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 461 किमी पर्यंत धावू शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 22.98 लाख रुपये आहे, अशा प्रकारे ही कार तुमच्यासाठी एक उत्तम कार ठरेल.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button