अहमदनगर

नगरमध्ये टी-20 क्रिकेट मॅचवर सट्टा; पोलिसांची कारवाई

अहमदनगर-नगरमध्ये क्रिकेटच्या सामान्यावर सट्टा खेळला जात आहे. भारत -पाकिस्तान या देशातील टी-20 किक्रेट मॅचवर सट्टा खेळविणार्‍यास कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील पटवर्धन चौकात ही कारवाई करण्यात आली आहे.

 

रविवारी भारत-पाकिस्तान देशातील टी-20 किक्रेटचा सामना होता. या मॅचवर नगर शहरातील पटवर्धन चौकात सट्टा खेळविला जात आहे, अशी माहिती कोतवालीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांना मिळाली.

 

त्यानुसार त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सायंकाळी पाच वाजता छापा टाकला. पटवर्धन चौकातील मनोहर वाईन्ससमोरील एका गाळ्यात एक व्यक्ती सट्टा खेळवित असल्याचे निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेऊन नाव विचारले असता. त्याने अमित सुभाषलाल गांधी (वय 42, रा. कोर्ट गल्ली, अहमदनगर) असे सांगितले. त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले. त्याने काही व्यक्तींना आयडी आणि पासवर्ड पुरविल्याचे आढळून आले.

 

त्याला परेश मुनोत याने सहाय्य केल्याचे आढळून आले. तो फरार आहे. दोघांविरूद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, अमोल गाडे, सुजय हिवाळे, संदीप थोरात, सोमनाथ राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button