अहमदनगर

अहमदनगर शहरात भारत जोडो यात्रेचे स्वागत; लोकशाहीवादी नगरकर काढणार “स्वागत यात्रा”….

Ahmednagar News:महाराष्ट्रात येणाऱ्या भारत जोडो यात्रेचे स्वागता करता व पाठिंबा दर्शवण्यासाठी “अहमदनगर शहरात स्वागत यात्रा” लोकशाहीवादी नागरिकांनी आयोजित केली आहे.

या यात्रेचे सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे. गणेश शिंदे,आंनद शितोळे सर, बापू चंदनशिवे, सचिन चोभे, प्रशांत जाधव, उद्धव काळापहाड, सचिन वारुळे, महादेव गवळी, राहुल ठाणगे,

झैद शेख, प्रवीण अनभुले, फराज पठाण, रोहन नलगे, व आदी मंडळींनी सोशल मीडियावर आवाहन करत यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा अहमदनगर शहरात रविवार दि.6 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 9:00 वाजता भगतसिंग पुतळा,

पत्रकार चौक येथून यात्रेची सुरुवात करण्यात येणार आहे. व महात्मा गांधी पुतळा, वाडिया पार्क अहमदनगर येथे यात्रेची सांगता होणार आहे…

Related Articles

Leave a Reply

Back to top button