अहमदनगर
कार-दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार

अहमदनगर- शिर्डी-नाशिक मार्गावर असलेल्या मढी खुर्द शिवारात (ता. कोपरगाव) कोल्हे वस्तीजवळ टोयोटा इनोव्हा या कारने दिलेल्या धडकेत देर्डे कोर्हाळे येथील दुचाकीस्वार अब्बास बाबुलाल सय्यद (वय 52) हा इसम जागीच ठार झाला.
तालुक्यातील मढी बु.शिवारात मढी फाट्याजवळ समोरून आलेल्या इनोव्हा कारने दिलेल्या जोराची धडक दिली. यात देर्डे कोर्हाळे येथील रहिवासी असलेला इसम अब्बास बाबुलाल सय्यद (वय-52) हा ठार झाला आहे. या अपघातानंतर संबंधित कार चालकाने त्यास उपचारार्थ दवाखान्यात दखल केले होते.