लेटेस्ट

बिग ब्रेकिंग : पेट्रोल आणखी महाग होणार…. एक लिटर होणार १५० रुपयांपर्यत !

देशातील नागरिकांसाठी एक वाईट बातमी आहे कारण पेट्रोल आणि डिझेल या इंधनांच्या किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीमुळे सर्वसामान्य माणूस हैराण झालेला आहे.

देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलचा भाव लिटरसाठी १०० रुपयांच्या वर पोचला आहे. तर अनेक शहरांमध्ये डिझेलचा भावदेखील १०० रुपये प्रति लिटरपेक्षा जास्त झाला आहे.

पेट्रोल आणि डिझेल यांच्या भाववाढीला लगाम न लागता आगामी काळात यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल आगामी काळात म्हणजे पुढील वर्षांपर्यत चांगलेच महाग होऊ शकते.

म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमती ११० डॉलर प्रति डॉलरपर्यत जाऊ शकतात. सध्या कच्च्या तेलाची किंमत ८५ डॉलर प्रति बॅरलच्या पातळीपेक्षा ३० टक्के जास्त आहे. अंदाजानुसार कच्च्या तेलाची किंमत १४७ डॉलर प्रति बॅरलच्या ऑल टाइम उच्चांकी पातळीवरदेखील पोचू शकते.

२००८ मध्ये कच्च्या तेलाच्या किंमती या पातळीवर पोचल्या होत्या. २००८ मध्ये आर्थिक संकटामुळे जगभरात मंदीचे वातावरण होते. गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार जर कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये जबरदस्त वाढ झाली तर पेट्रोलचा भाव १५० रुपये प्रति लिटरच्या पातळीवर पोचू शकतो. तर डिझेलचा भावदेखील १४० रुपये प्रति लिटरवर पोचू शकतो.

पेट्रोल आणि डिझेलच्या भावात नजीकच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. गुरूवारी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात ३५-३५ पैशांची प्रति लिटरमागे वाढ झाली.

सध्या देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव १०८.२९ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा भाव ९७.०२ रुपये प्रति लिटरच्या विक्रमी पातळीवर आहे. या महिन्यात आतापर्यत २८ दिवसांमध्ये २१ दिवस इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल ६.६५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ७.२५ रुपये प्रति लिटरने महाग झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button